जळगाव : घरपट्टीच्या तक्रारींची सुनावणी सुरूच राहणार

प्रत्येक प्लॅटधारकाला नळ कनेक्शन : ९७७.४६ कोटीचे अंदाजपत्रक मंजूर
जळगाव : घरपट्टीच्या तक्रारींची सुनावणी सुरूच राहणार

जळगाव : महापालिकेतर्फे घरपट्टी वाढीच्या देण्यात आलेल्या बिलाबाबत नागरिकांना आक्षेप असल्यास त्याची सुनावणी निरंतर सुरू राहील. तसेच अपार्टमेंटमधील प्रत्येक प्लॅटधारकांस अमृत नळयोजनेचे कनेक्शन देण्यात येणार आहे. २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात पाच कोटींची वाढ करून ९७७ कोटी ४६ लाखाचे अंदाजपत्रक सर्वानुमताने मंजूर करण्यात आले आहे.

महापालिकेची तहकूब करण्यात आलेली २०२२ -२३ ची अंदाजपत्रकाची सभा गुरुवारी (ता. ३१) घेण्यात आली. सकाळी अकरा वाजता महापाालिकेच्या इमारतीच्या सभागृहात विशेष महासभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पीठासीन अध्यक्ष महापौर जयश्री महाजन होत्या तर व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. प्रारंभी महापौर जयश्री महाजन यांनी मूळ अंदाजपत्रकात ५ कोटी रुपयांची वाढ सुचवीत ९७७ कोटी ४६ लाखांचे अंदाजपत्रक सादर केले. यावर सभागृहात चर्चा होऊन ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

विरोधकांतर्फे सूचना

विरोधी भारतीय जनता पक्षातर्फे अंदाजपत्रकात काही नवीन सूचना सुचविण्यात आल्या, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, कैलास सोनवणे यांनी काही सूचना मांडून अंदाजपत्रकात दुरुस्ती सूचविली. शिवसेना नगरसेवक इब्राहीम पटेल यांनी शहरातील रस्त्यावरील खड्डे तसेच इतर समस्या मांडल्या, नगरसेवक प्रा. सचिन पाटील यांनीही सद्या देण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीची समस्या मांडली.

वाढीव घरपट्टीची सुनावणी कायम

महापालिकेतर्फे शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याची वाढीव घरपट्टीची बिले नागरिकांना देण्यात आली आहेत. अनेकांना अवाजवी पान ४ वर

अशी झाली नवीन तरतूद

अंदाजपत्रकात पाच कोटींची नवीन तरतूद करण्यात आली, ती अशी : महिला बालकल्याण दिव्यांग निधीसाठी प्रत्येक दोन कोटी, अद्यावत प्रसूतिगृहासाठी ५० लाख, शाळेत क्रीडा व मनोरंजन तसेच योग प्रशिक्षण, डिजीटल शाळा संकल्पनेसाठी १ कोटी, वृक्ष लागवड,संवर्धन ५० लाख, नवीन गटारी १ कोटी, नवीन शौचालय व मुतारी ५० लाख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com