Jalgaon News : सात्री ग्रामस्थांचे आंदोलन तूर्तास स्थगित

Protest
Protestesakal

Jalgaon News : सात्री गावाच्या रस्त्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. (protest movement of Satri villagers has stopped jalgaon news)

येत्या आठवड्यात अंतिम निर्णय प्राप्त करून निर्णय कळवला जाईल असे आश्वासन देण्यात आल्याने सात्री करांनी पुतळा दहनाचे आंदोलन स्थगित केले आहे.

सात्री गावाला जायला पावसाळ्यात रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाही आणि यामुळे तीन वर्षात तिघांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी मृतांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Protest
Jalgaon News : दोन्ही बाळ मूळ मातांच्या कुशीत विसावली!

त्यामुळे जळगाव येथे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात सर्व अधिकारी व सात्री गावच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मुख्य अभियंता खांडेकर, उपअभियंता जितेंद्र याज्ञीक, निम्न तापी प्रकल्प कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी,

पुनर्वसन व पुनर्विलोकन समिती सदस्य महेंद्र बोरसे, रवींद्र बोरसे, प्रकाश बोरसे, शालिग्राम पाटील, सुनील बोरसे, खंडेराव मोरे, मगन भिल, श्रीराम बागूल, दीपक मोरे, आसाराम बागूल, मनोहर बोरसे, राजेंद्र ठाकरे, पाडळसरे जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, गोकुळ पाटील हजर होते.

Protest
Jalgaon Crime News : भुसावळ हादरले...! नराधम मुलाने केला जन्मदात्या आईसह पत्नीचा खुन....

जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता य. का. भदाणे यांनी यासंदर्भात तापी महमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवले आहे.

सात्री गावाकडून निंभोरा गावाकडे शेतरस्ता वजा पाटचारी निरीक्षण रस्त्यासाठी ४ कोटी ५५ लाख ३९ हजार रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी, असे पत्र सोमवारी (ता. २२) सादर केले.

आणि आठ दिवसांत मान्यता मिळवून देतो, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने पुतळादहन आंदोलन स्थगित करण्यात आले.

Protest
UPSC Exam : ‘यूपीएससी’त वरखेडेचा देशभरात डंका! रोशन कच्छवा 620 व्या रँकने उत्तीर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com