Jalgaon News : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 statement renaming Ahmednagar district to Ahilya Nagar

Jalgaon News : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा!

अमळनेर (जि. जळगाव) : येथील राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व धनगर समाजबांधवांतर्फे अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. (Raje Malharrao Holkar Pratishthan Dhangar Samaj Bandhwa given statement renaming Ahmednagar district to Ahilya Nagar Jalgaon news)

नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी निवेदन स्वीकारले. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. सीना नदीकाठी वसलेल्या या गावात धनगर समाजाचे दैवतांचा जन्म झाल्याने ती भूमी पवित्र झाली आहे.

या नामांतर करता संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात नामांतर रथयात्रा व मोर्चे समाजबांधवांनी काढले आहेत. राज्यातील समाजबांधवांची नामांतरची मागणी आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना लक्षात घेऊन अहिल्यानगर नामकरण व्हावे, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

या वेळी अध्यक्ष बन्सीलाल भागवत, उपाध्यक्ष नितीन निळे, सचिव एस. सी. तेले, कार्याध्यक्ष डी. ए. धनगर, संघटक प्रभाकर लांडगे, उपाध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, हमाल मापाडी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश शिरसाठ, मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाठ,

युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवा लांडगे, धानोरा सरपंच दिलीप ठाकरे, निंभोरा उपसरपंच आलेश धनगर, प्रदीप कंखरे, जयप्रकाश लांडगे, शशिकांत आढावे, प्रताप धनगर, तुषार इदे, सचिन शिरसाट, जितेंद्र धनगर, अनिल धनगर, भाऊलाल पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.