अतिक्रमणात धार्मिक स्थळे हटवू नका; रक्षा खडसे

रक्षा खडसे यांच्या सूचना : डीआरएम कार्यालयात आढावा बैठकीत विविध प्रश्‍नांवर चर्चा
Raksha Khadse Do not touch religious sites in encroachment bhusaval
Raksha Khadse Do not touch religious sites in encroachment bhusavalsakal

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतर्गत रेल्वे विभागाच्या विविध विकासकामे व समस्यांसंदर्भात डीआरएम कार्यालयात खासदार रक्षा खडसे व डीआरएम एस. एस. केडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली.बैठकीत रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेस्थानक तसेच भुसावळ रेल्वेस्थानक येथील प्रगतिपथावर असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

तसेच रेल्वे मंत्रालयाने भुसावळ मंडळांतर्गत प्रस्तावित केलेल्या विविध प्रकल्पांची विकासकामे, भुसावळ मंडळांतर्गत असलेल्या रेल्वे मार्गांवर नव्याने बनविण्यात येणाऱ्या आरओबी व आरयूबी कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या वेळी भुसावळ स्थानक येथे प्रलंबित विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. खासदार रक्षा खडसे यांच्यासह झेडआरयूसीसी सदस्य परिक्षित बऱ्हाटे, डीआरएम एस. एस. केडिया, एडीआरएम नवीन पाटील, आर. मीणा, सीनिअर डीसीएम युवराज पाटील, सीनिअर डीओएम आर. के. शर्मा व संबंधित रेल्वे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

ड्रेनेजची कामे मार्गी लावण्याच्या सूचना

रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे संबंधीच्या तसेच रेल्वेच्या इतर कामांचा आढावा घेऊन भुसावळ शहरांतर्गत आराधना कॉलनी भागातील ड्रेनेजची कामे तत्काळ मार्गी लावावी, याबाबत डीआरएम केडिया तथा रेल्वे अधिकाऱ्यांना खासदार खडसे यांनी सूचना केल्या. तसेच आपल्या स्तरावरून रेल्वे मंत्रालयास कोणकोणत्या बाबींचा पाठपुरावा करावा, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. भुसावळ शहरांतर्गत रेल्वे विभागामार्फत सध्या काढण्यात येत असलेल्या अतिक्रमणांमध्ये कोणतीही धार्मिक स्थळे काढण्यात येऊ नये, याबाबत विशेष सूचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com