Ration Card News : रेशनकार्डधारकांना आता मिळणार ‘ई-शिधापत्रिका’; पुरवठा विभागाचा निर्णय | Ration card holders will now get e ration card Supply Division decision Implementation soon in district Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ration Card

Ration Card News : रेशनकार्डधारकांना आता मिळणार ‘ई-शिधापत्रिका’; पुरवठा विभागाचा निर्णय

Jalgaon News : पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंब योजना व राज्य योजनेच्या एपीएल शेतकरी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त शिधापत्रिकाधारक, अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना आता ऑनलाइन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा निशुल्क उपलब्ध होणार आहे.

अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदारास संकेतस्थळावरून ई-शिधापत्रिका डाउनलोड करता येईल.(Ration card holders will now get e ration card Supply Division decision Implementation soon in district Jalgaon News)

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ‘क्यूआर’ कोड आधारित ई-शिधापत्रिका ऑनलाइन तसेच डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्या शिधापत्रिकेवर ‘अंत्योदय अन्न शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब योजना’ ‘राज्य योजनेंतर्गत’, ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत’, असे नमूद करण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ऑनलाइन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधांसाठी सेवानिहाय शुल्क निश्चित केले आहे.

अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार सेवाशुल्क भरून ऑनलाइन ई-शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर ई-शिधापत्रिका डाउनलोड करता येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दर निश्चित

अंत्योदय अन्न योजनेसाठी २५ रुपये, प्राधान्य कुटुंब योजनेसाठी ५० रुपये, एपीएल शेतकऱ्यांसाठी ५० रुपये, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त व एपीएल शेतकरीव्यतिरिक्त ५० रुपये व शुभ्र शिधापत्रिका शंभर रुपये, असे दर यापूर्वी निश्चित केले होते.

मात्र, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व राज्य योजनेचे शिधापत्रिकाधारक गरीब व गरजू कुटुंबातील आहेत.

त्यामुळे या योजनांच्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ऑनलाइन ई-शिधापत्रिका सुविधेसाठी सेवाशुल्क न आकारता मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. त्याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.

टॅग्स :JalgaononlineRation Card