Jalgoan News : संकुल तळमजल्यावरील दुकानांची पुन्हा चौकशी; बैठकीत निर्णय | Re examination of shops on ground floor of complex jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

parking

Jalgoan News : संकुल तळमजल्यावरील दुकानांची पुन्हा चौकशी; बैठकीत निर्णय

Jalgaon News : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला संकुलाच्या तळमजल्यावरील दुकानासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची नुकतीच बैठक झाली. तीत तक्रार असलेल्या प्रत्येक संकुलाची पुन्हा जागेवर जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Re examination of shops on ground floor of complex jalgaon news)

शहरातील व्यापारी संकुलातील तळमजल्यावर पार्किंग दाखवून अनेकांनी दुकाने काढली आहेत. त्यामुळे रस्त्यावर पार्किंगचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वर्षभरापूर्वी महापालिका ते घाणेकर चौकादरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते.

यात अनेक दुकानदारांनी पार्किंगच्या जागा दाखवून ते उपयोगात घेतल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावर नगररचना विभागाने सुनावनी घेतली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मात्र, त्यातून काहीच फलित निघाले नाही. कारवाईसाठी मुख्य लेखाधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापरीक्षक तथा उपायुक्त (सामान्य प्रशासन), उपायुक्त (महसूल) यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक नुकतीच झाली. तीत तक्रार आलेल्या व्यापारी संकुलाची तपासणी करून संयुक्त अहवाल तयार करून कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे.