Jalgaon News : रिअल इस्टेट एजंटला ‘महारेरा’ चे प्रमाणपत्र अनिवार्य

Real Estate Rules
Real Estate Rulesesakal

जळगाव : घर विकणारा आणि घर हवे असणारा, या दोघांमधील दुवा म्हणून रिअल इस्टेट एजंट काम करीत असतो. दोन्ही बाजूंच्या घटकांचे समाधान करत स्वतःचा निर्वाह करण्याची भूमिका पार पाडणाऱ्या या मध्यस्थाला आता ‘सक्षमता’ प्रमाणपत्र अर्थात कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट प्राप्त करावे लागणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणा (महारेरा)ने परिपत्रक काढले आहे. १ मेपर्यंत रिअल इस्टेट एजंटाने प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. (Real Estate Agent Certificate of Maharera is mandatory Deadline to get certificate till 1st May Jalgaon News)

Real Estate Rules
Jalgaon News : महापालिका करणार सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण; वैयक्तिक शौचालय अनुदान

रिअल इस्टेट एजंट घर, प्लॉट व फ्लॅट, अशा प्रकारच्या खरेदी-विक्री व्यवहारातील महत्त्वाचा घटक आहे. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात ३८ हजार ७७१ रिअल इस्टेट एजंट ‘महारेरा’कडे नोंदणीकृत आहेत.

या पार्श्वभूमीवर या एजंट्सच्या कार्यपद्धतीत सुसंगतता यावी, खरेदी विक्रीचे व्यवहारासंबंधी संपूर्ण कायदेशीर माहिती असायला हवी, या सर्व बाबींचा विचार करून ‘महारेरा’ दोन वर्षांपासून अभ्यासक्रम आणण्याच्या तयारीत होता.

यासंदर्भात रिअल इस्टेट एजंट, बँकिंग संस्था, घर खरेदीदार, प्रवर्तक आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नन्स यांच्याशी चर्चा करून अभ्यासक्रम तयार केला आहे.

रिअल इस्टेट एजंटसाठी तयार केलेला अभ्यासक्रम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. एजंटच्या सुविधेनुसार हा अभ्यासक्रम ऑनलाइन, प्रत्यक्ष किंवा हायब्रीड (ऑनलाइन व प्रत्यक्ष दोन्ही) स्वरूपात राहणार आहे.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Real Estate Rules
Nashik News: नाशिककरांवर करवाढ अटळ राहण्याची शक्यता! दप्तरी दाखल ठरावावरून हायकोर्टाची राज्य शासनाला विचारणा

अंमलबजावणी १ मेपासून

घर खरेदीदार आणि बिल्डरमधील मध्यस्थ म्हणून वावरत असणारी व्यक्ती ज्ञानसज्ज असावी, यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ‘महारेरा’च्या परिपत्रकानुसार १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. १ मेपर्यंत सक्षमता प्रमाणपत्र असलेली व्यक्ती रिअल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी करू शकणार आहे.

"जिल्ह्यात सुमारे चारशे रिअल इस्टेट एजंट आहेत. मी, मिलन मेहता, चंदन तोष्णिवाल यांच्याकडे ‘महारेरा’चे प्रमाणपत्र आहे. इतरांकडे आहे की नाही, याची माहिती घ्यावी लागेल. हे प्रमाणपत्र सर्वांनाच कंपलसरी नाही, असे वाटते."

-रमेशकुमार मुनोत, संचालक, ओमसाई रिअल इस्टेट

Real Estate Rules
Nashik News : अश्विनीनगर उद्यानाला अवकळा; उद्यान दुरवस्थेकडे प्रशासनाचा काणाडोळा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com