Jalgaon Crime News : बालसुधारगृहातून सुटला अन् पुन्हा काढली छेड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

molestation

Jalgaon Crime News : बालसुधारगृहातून सुटला अन् पुन्हा काढली छेड!

पाचोरा (जि. जळगाव) : मुलीची छेड काढण्याच्या आरोपाखाली बालसुधारगृहात राहून जामिनावर मुक्त झालेल्या अल्पवयीन मुलाने पुन्हा अल्पवयीन मुलीस धमकावत तिची छेड काढल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे कळमसरा व लोहारा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. (Released from juvenile detention center and teased girl again Jalgaon Crime News)

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

हेही वाचा: Nashik News : आजी- माजी मंत्री अन् 3 आमदार तरीही भार प्रभारीवर!; इतरही 500 वर पदे रिक्तच!

कळमसरा येथील अल्पवयीन मुलगी गावालगतच्या नदीवर कपडे धुण्यासाठी जात असताना तिचा दुचाकीने पाठलाग करत गावाबाहेरच्या नदीपात्राजवळ तिला अडवून तू मला आवडते, जास्त भाव खाऊ नकोस, असे म्हणत व हात पकडून माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या कुटुंबीयांना संपवून टाकेल, अशी धमकी दिली. मुलीस लज्जा वाटेल असे वर्तन केले. यामुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिने आपली सुटका करून घेत घर गाठले व झाला प्रकार आई वडिलांना सांगितला. त्या आधारे पीडितेच्या आई- वडिलांनी लोहारा पोलिस दूरक्षेत्र गाठून तक्रार दिली. हा प्रकार कळताच लोहारा व कळमसरा येथील हिंदवी संघटनेचे अनेक कार्यकर्ते एकत्रित आले.

त्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. पोलिस पाटील महेंद्र शेळके यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयित अल्पवयीन मुलगा या अगोदरही अशाच प्रकारात सहआरोपी म्हणून बालसुधारगृहात होता. गेल्या दोन महिन्यापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली आहे. अशा परिस्थितीत त्याने पुन्हा तशाच स्वरूपाचा गुन्हा केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik News : ट्रकने चिरडल्याने 4 वर्षीय बालक ठार; खर्जुल मळा येथील घटना