Jalgaon News : अमळनेरला किसान काँग्रेसकडून महसूल प्रशासनाचा निषेध

Revenue administration protest by Kisan Congress in amalner jalgaon
Revenue administration protest by Kisan Congress in amalner jalgaonesakal

अमळनेर (जि. जळगाव) : शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महसूल प्रशासनाचा निषेध व्यक्त करत मंगळवारी (ता. २१) सकाळी अकराला येथील तहसील कार्यालयात काळी गुढी उभारून प्रशासनाच्या विरोधात किसान काँग्रेसकडून (Congress) आंदोलन करण्यात आले. (Revenue administration protest by Kisan Congress in amalner jalgaon)

या वेळी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच शासन निर्णय व निकष पाहून वंचित शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.

२९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने शेतकऱ्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. जून २०१९ मध्ये पेरणी केली (जिल्हा बँक किंवा राष्ट्रीय बँक) अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना २०१९ मध्ये पेरलेल्या पिकासाठी १ हेक्‍टरसाठी बँकांनी दिलेले कर्ज आणि त्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत जमा झालेले व्याज म्हणजे बाधित गावातील शेतकऱ्यांनी बागायती कपाशीची लागवड केली असल्यास त्यांनी घेतलेले कर्ज, जिल्हा बँकेकडून १ हेक्टरसाठी ४६ हजार कर्ज, सन २०१९ मधील नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ४६ हजार अधिक व्याजाची रक्कम भेटून द्यावी, याबाबत अमळनेर तहसीलदार तसेच जिल्हा उपनिबंधक यांना वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने देण्यात आली होती.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

Revenue administration protest by Kisan Congress in amalner jalgaon
Jalgaon News : ‘पाडळसरे’ची केवळ 100 कोटींवरच बोळवण; अधिवेशनात गरजले आमदार पाटील

जिल्हा उपनिबंधक यांनी देखील तहसीलदार अमळनेर यांना १९ जानेवारी २०२३ ला पत्र देऊन शासन निर्णय १३ मे २०१५ व २९ ऑगस्ट २०१९ ची अंमलबजावणी करण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र रक्कम उपलब्ध असूनही तहसीलदार नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज माफी देत नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला. हेतुपुरस्कर शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या महसूल विभागाच्या निषेधार्थ मंगळवारी तहसील कार्यालयावर काळी गुढी उभारण्यात आली होती.

या वेळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात प्रा. सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, संदीप पाटील, सुरेश पाटील, प्रा. अशोक पवार, गोकुळ बोरसे, भागवत सूर्यवंशी, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, राजू फाफोरेकर,

जयवंतराव पाटील, प्रसाद शर्मा, विजय पाटील, मनोहर पाटील, गुलाबराव पाटील, त्र्यंबक पाटील, प्रमोद पाटील, भीमसेन पाटील, श्याम पवार, अशोक कदम, विकास पाटील, गौरव पाटील, सुनील शिंपी, नामदेव पाटील, राजेंद्र देशमुख, प्रवीण देशमुख, संजय सूर्यवंशी, जयेश पाटील, सुनील भालेराव आदी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

Revenue administration protest by Kisan Congress in amalner jalgaon
Jalgaon News : भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे निलंबित; गौण खनिज प्रकरण भोवले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com