Latest Marathi News | सातपुडा परिसरातील नदीनाले ओसांडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

सातपुडा परिसरातील नदीनाले ओसांडले

रावेर : लालमाती (ता. रावेर) येथील मात्राण धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. सांडव्यातून पाणी नदीपात्रात येऊन त्यावरील मात्राण नदी दुथडी भरून वाहात आहे. तालुक्यातील सर्व इतर पाच धरणे जुलैमध्येच ओसांडून नदी- नाले दुथडी भरून वाहात आहेत. यामुळे तालुक्यातील सर्वच भागातील भूजलपातळी वाढल्यामुळे सिंचन क्षेत्रातही वाढ होणार आहे. (Latest Marathi News)

मात्राण धरण गुरुवारी (ता. ११) ओव्हर फ्लो होऊन सांडव्यातून पुराचे पाणी नदीपात्रात आले. मात्राण नदी दुथडी भरून वाहात असल्याने रावेर, मुंजलवाडी, कुसुंबा, अजंदे आदी शेती शिवारातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तालुक्यात मागील पंधरवाड्यात सातपूडा पर्वत भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे सुकी, अभोरा, मंगरुळ, गंगापुरी, चिंचाटी ही धरणे ‘ओव्हरफ्लो’ होऊन यावरील सुकी, भोकर, बोकड आदी नदीनाले वाहात आहे. यामुळे तालुक्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे सिंचनासाठी फायदा होईल व टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: Rain forecast : राज्यातील धरणांत ७५ टक्के पाणीसाठा

‘अग्नावती’त शून्य टक्के जलसाठा; पावसाची प्रतीक्षा

नगरदेवळासह परिसराची खऱ्या अर्थाने आर्थिक उलाढाल अग्नावती प्रकल्पावर अवलंबून असते. ऑगस्टचा पहिला आठवडा संपला मात्र अग्नावती नदीच्या उगमस्थानी चांगला पाऊस अद्याप न झाल्याने प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

नगरदेवळासह परिसरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून, बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर अवलंबून मजूर वर्ग आहे. अग्नावती प्रकल्प भरला तर केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यावर बाजारपेठेत आर्थिक उलाढाल होत असते. प्रकल्प भरेल या अपेक्षेने केळी लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मात्र पुरेसा पाणीसाठा अद्याप न झाल्याने नगरदेवळेकरांना प्रकल्प भरण्याची प्रतीक्षा आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रकल्प सुरवातीलाच भरत होता. त्या मुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान होते.

हेही वाचा: पाऊस झेलत जपली सोंगांची परंपरा

कधी नव्हे अग्नावती फेब्रुवारी महिन्यात देखील वाहात होती. जिल्ह्याचा काही भाग वगळता इतरत्र पाऊस चांगला झाल्याने बहुतेक धरण ओसंडून वाहत आहेत. अग्नावतीतील शून्य टक्के पाणीसाठा बघता वरुणराजा धो धो बरसल्यास तो वेळ लागू देणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Rivers In Satpuda Area Overflowed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonrainsatpudaRiver