Jalgaon News : दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

sai joshi
sai joshiesakal

जळगाव : येथील एस. एस. मनियार विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सई अनिल जोशी हिची २ ते ८ एप्रिलदरम्यान दक्षिण कोरियाच्या सेऊल येथे होणाऱ्या वुमन अशिया कप सॉफ्टबॉल (Softball) चँपियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Sai Joshi selected for softball tournament in South Korea jalgaon news)

सई जोशी या स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून फक्त पाच मुलींची निवड झाली आहे. त्यात जळगावच्या सई जोशीसह स्वप्नाली वायदंडे (कोल्हापूर), ऐश्वर्या बोडके (पुणे), श्रद्धा जाधव (लातूर), ऐश्वर्या भास्करन (मुंबई) यांचा समावेश आहे.

सईने यापूर्वी चीन, तैवान येथील स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत अनेकवेळा राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण, रजत आणि कांस्य पदके मिळविली आहेत. गेल्या वर्षी तिला शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

sai joshi
Jalgaon News : आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत साई करणार देशाचे प्रतिनिधित्व

सई जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे मीडिया विभागप्रमुख अनिल जोशी व जळगाव जनता बँकेच्या अधिकारी नीलम जोशी यांची कन्या आहे. तिच्या या निवडीबद्दल मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे आदींनी अभिनंदन केले.

sai joshi
Jalgaon News: खडसेंवर आरोप करण्याऱ्यांनी आपण काय केले हे तपासावे : अशोक लाडवंजारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com