Sakal Impact : वटेश्वर गोशाळेवर चाऱ्याचा ओघ; ‘सकाळ’च्या वृत्ताची दात्यांकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Workers unloading kutti fodder sent by donors for cows. and
The report of Wateswar Goshale published in the 23rd February issue of 'Sakal'.

Sakal Impact : वटेश्वर गोशाळेवर चाऱ्याचा ओघ; ‘सकाळ’च्या वृत्ताची दात्यांकडून दखल

मेहुणबारे (जि. जळगाव) : वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील वटेश्वर गोशाळेवर निर्माण झालेल्या चाराटंचाईसंदर्भात गुरुवारी (ता.२३) ‘सकाळ’मध्ये ‘वडगावला चाऱ्याअभावी गायींचे (Cow) हाल’ या मथळ्याखाली वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते. (sakal newspaper published news about cow not getting fodder after news cows are getting fodder from various places jalgaon news)

वृत्त वाचून गायींना विविध ठिकाणाहून चारा उपलब्ध होत आहे. गायींना चारा मिळत असल्याने गोसेवक रविदास महाराजांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र लोकहिताच्या कामासाठी कायम अग्रेसर असल्याची भावना व्यक्त केली.

वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमातील गोशाळेत दोनशेहून अधिक देशी गायींचे संगोपन केले जात आहे. चाऱ्यांचे वाढलेले भाव, गावपातळीवर शासनाच्या पोहचत नसलेल्या विविध योजना अशा कारणांमुळे गुरांची संख्या घटत आहे. या संदर्भात २३ फेब्रुवारीस ‘सकाळ’च्या अंकात ‘वडगावला चाऱ्याअभावी गायींचे हाल’ बातमी प्रसिद्ध केली.

त्यात वटेश्वर आश्रमावरील गोसेवक रविदास महाराज यांच्याकडे लहान मोठ्या सुमारे दोनशेवर देशी गायी आहेत.या गायींचे चाऱ्याअभावी पालनपोषण कसे करावे? याची चिंता महाराजांनी व्यक्त करत चारा दान करण्याचे आवाहन बातमीतून केले होते. ‘सकाळ’ची बातमी सोशल मीडियावरील फेसबूक, व्हॉट्सॲप ग्रुपवर, ट्विटरवर शेअर केल्याने अनेकांनी बातमी वाचून चारा देण्याची ग्वाही दिली तर काहींनी चारा दिला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

..यांनी केली मदत

पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील कापूस व्यापारी विजय पाटील यांनी एक आयशर भरून कुट्टी चारा पाठवून दिला. कजगाव (ता. भडगाव) विकास सोसायटीचे चेअरमन स्वप्नील पाटील, युवा उद्योजक भूषण शिनकर सरपंच अनिल महाजन, रामचंद्र कोळी, ‘सकाळ’चे पत्रकार प्रमोद पवार, गोंडगाव येथील उमेश देवा व कजगाव ग्रामस्थांकडून देखील मदत देण्यात आली.

चाळीसगाव शहरात ‘सकाळ’ची बातमी वाचल्यावर १९९९ च्या बँचच्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. यानंतर चाऱ्यासाठी आर्थिक मदत देखील बाबा रविदास महाराज यांच्याकडे करण्यात आली.

मेहुणबारे येथील किरण घोरपडे, प्रभाकर पाटील, मेघराज राठोड, फुलवाले दादाभाऊ, भय्या पाटील, करणकाळ आबा, आनंदा महाराज, हिरापूर (ता. चाळीसगाव) येथील विनय महाराज, नाशिक जिल्ह्यातील गोरख महाराज, पियूष अग्रवाल, ब्राह्मण शेवगे (ता.चाळीसगाव) येथील केतन देसले यांनी पाच टन ऊस दिला. मात्र गायींची संख्या पाहता अजूनही या ठिकाणी चाऱ्याची नितांत गरज आहे.

अजूनही चाऱ्याची गरज

वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमातील गोशाळेतील आजही अनेकजण गायी देतात.या गायींबरोबर चारा मात्र कुणीही देत नाही. ज्यांना आता गायी द्यायच्या असतील त्यांनी चारा देखील देण्याचे प्रयोजन करावे. येथील चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चाऱ्याअभावी गायींचे होणारे हाल पहावत नसल्याने रविदास महाराज गायींविषयी बोलताना डोळे पाणावले होते. आश्रमातील गायींना गरजेच्यावेळी चारा उपलब्ध झाला असला तरी अजूनही चारा द्यावा, असे रविदास महाराज यांनी आवाहन केले तर ‘सकाळ’सह गायींना चारा देणाऱ्या सर्व दात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

"सध्याच्या परिस्थितीत अनेकांना गायींचे संगोपन करणे शक्य होत नाही. जो संगोपन करतो त्याला गायीसाठी वैरण दान करून पुण्य मिळवावे. ज्यांना गायींसाठी चारा द्यायचा असेल त्यांनी या पुण्याच्या कार्यात सहभागी व्हावे. ‘सकाळ’ने हा विषय थेट लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केल्याने खास करून त्यांचे शतशः आभार मानत आहे." - रविदास महाराज, वडगावलांबे आश्रम (ता. चाळीसगाव)