जळगाव : आव्हाण्यात वाळूमाफियांचा शेतकऱ्यावर हल्ला

यंत्रणांनी टेकले हात; माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतीच
sand mafia
sand mafiasakal

जळगाव : आव्हाणे (ता. जळगाव) येथील गिरणा नदीपात्रात(girna river) वाळूउपशाला विरोध केल्याने वाळूमाफियांनी(sand mafia) शेतकऱ्याला बेशुद्ध होईपर्यंत जबर मारहाण(crime) केली. ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतल्यानंतर मरणासन्न अवस्थेत शेतकऱ्याला सोडून वाळू चोरट्यांनी ट्रॅक्टर सोडून पळ काढला. मनोहर चौधरी (रा. आव्हाणे, ता. जळगाव) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.आव्हाणे शिवारात मनोहर चौधरी यांचे गिरणा नदीपात्रालगत शेत आहे. वाळूचा प्रचंड उपसा होत असल्याने शेतविहिरीतील पाणी वळून जाते, तसेच वाळूच्या चोरट्या वाहतुकीसाठी चौधरी यांच्या शेतातूनच ट्रॅक्टर- डंपरचा रस्ता तयार झाला आहे. रात्री-अपरात्री शेतातून या वाहनांचे ये-जा होत असल्याने शेताशेजारील थडीवरून वाळूउपसा करू नका, असे मनोहर चौधरी गेल्या काही दिवसांपासूनच अनेक ट्रॅक्टरचालकांना समजावून सांगत होते. (sand mafia attack on farmers from girna river)

sand mafia
अहमदनगर : शहरातील बंगाली चौक रस्त्यावर खून

..अखेर हल्ला केलाच

असे असताना शुक्रवारी (ता. १४) सकाळीच शेतातून ट्रॅक्टरची ये-जा होत असल्याचे कळताच चौधरी यांनी शेत गाठले. नदीपात्रात वाळूचा बेकायदेशीर उपसा करून वाळूने भरलेले ट्रॅक्टर शेतातून नेऊ नका म्हणून त्यांनी विरेाध केल्याने वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन वाळूमाफियांनी मनोहर चौधरींना बेदम मारहाण केली.

मेल्याचे समजून सोडल

बेदम मारहाणीत मनोहर चौधरी यांची शुद्ध हरपली. इतक्यात चौधरी यांना मारहाण होत असल्याचे कुटुंबीयांना कळताच नातेवाईक कुटुंबीयांनी नदीपात्राकडे धाव घेतली. नदीपात्राच्या दिशेने धाव घेतलेल्या नातेवाइकांना बघून चौधरी यांना मरणासन्न अवस्थेत सोडून मारहाण करणाऱ्या गुंडांनी धूम ठोकली. तशाच अवस्थेत मनोहर चौधरी यांना घेऊन कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली.

sand mafia
अहमदनगर : पोलिसांना मिळणार लवकरच घरे

हप्तेखोरीने वाढली हिंमत

महसूल खात्यातील तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार वाळूमाफियांनी खिशात घातल्याची परिस्थिती आहे. तर, नदीपात्राची हद्द असणारे पोलिस ठाणे असो की हद्दीतून बेकायदा वाळू वाहतूक असो ठरलेल्या तारखेला पोलिसदादाच्या हातावर कलेक्शनची रक्कम टेकवली जाते. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वेगळे सांगायला नकोच. पूर्वीपासूनच गुंड, गुन्हेगार आणि राजकीय आश्रयाला असलेल्यांनी वाळूचोरीचे धंद्यात पाय रोवले आहे. सरकारलाच आपण पैसा देतो, मग भीती कशाची, कुणाची या आविर्भावात अक्षरशः गुन्हेगारी पद्धतीने ही मंडळी नदीपात्रालगतच्या गावांमध्ये दहशत निर्माण करतात. त्याचाच एक भाग म्हणून आव्हाण्यात दहशत माजविण्यासाठी आज मनोहर चौधरी यांच्यावर हल्ला(attack) झाल्याचे सांगण्यात येते.

sand mafia
अहमदनगर : शेतकऱ्याचा खून करणाऱ्या दोघा भावांना जन्मठेप

आव्हाणे शिवारात काल दोन अवैध वाळूची वाहने(seal 2 veichile ) जप्त केली आहेत. आजच्या हल्ल्याच्या घटनेत संबंधितांवर तहसीलदार व पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी(collector abhijeet raut)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com