Summer Heat : आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा; वातावरणातील बदलामुळे रुग्णालये फुल्ल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

summer heat rising

Summer Heat : आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा; वातावरणातील बदलामुळे रुग्णालये फुल्ल!

वावडे (जि. जळगाव) : गेल्या चार ते पाच दिवसांपासून अमळनेर तालुक्यासह परिसरात कमाल पारा ३८ अंशांवर गेल्याने उन्हाचा (Summer) तडाका वाढला आहे.

पहाटे काही अंशी वातावरणात गारवा जाणवत असून, सकाळपासूनच कडक ऊन जाणवत आहे. ( scorching sun has increased as maximum mercury has risen to 38 degrees in area amalner jalgaon news)

वातावरणातील बदलामुळे सर्दी, तापासह विविध आजारांचे रुग्ण वाढत असून, आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. महिला उन्हापासून बचाव करण्यासाठी आतापासूनच स्कार्फ गुंडाळून सनकोटचा वापर करताना दिसू लागल्या आहेत.

शिवाय त्वचेचा काहींना त्रास जाणू लागल्याने सनस्क्रीन लोशन व इतर औषधांचा वापर करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांना उन्हाची लाही जाणवू लागली आहे. त्यात परीक्षा सुरू झाल्याने आता कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे.

नोकरदारवर्गही उन्हाच्या त्रासामुळे आठच दिवसात मेटाकुटीला आला आहे. अद्याप उन्हाळ्याला एप्रिल, मे बाकी आहे. तोपर्यंत सर्वच चांगले थंडगार पेयाकडे वळू लागले आहे. बाजारातही कलिंगड, द्राक्षे फळांची मागणी वाढली आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

बचावासाठी चष्मांची खरेदी

उन्हाची चाहूल लागली असून, दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी चष्मे, रुमाल, स्कार्फ खरेदी करत आहेत. शहरातील विविध मार्गावर चष्म्याचे स्टॉल लागले आहेत.

उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात चष्म्यांच्या खरेदीसाठी किरकोळ गर्दी होत आहे, तर रुमाल, स्कार्फ व टोप्यांची दुकाने शहरात सजली आहेत. शहरात व राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्गांच्या कडेला असलेले चष्म्याचे स्टॉल नागरिकांना आकर्षित करीत आहेत.

बाजारात गरिबांचे फ्रीज दाखल

उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाणीच सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठ विक्रीसाठी बाजारात सज्ज ठेवले जातात. यंदा खास मातीपासून तयार करण्यात आलेले माठ विक्रीसाठी आलेले आहेत.

फ्रिजसारखा थंडावा देणाऱ्या या माठांना चांगली मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. गरिबांचे फ्रिज असे माठाला म्हटले जाते. पाणी हे आरोग्यदायी असते दिवसातून किंवा दहा मोठे ग्लास पाणी गरजेचे असते. वैद्यकीय सल्ल्यातही पाण्याला महत्त्व दिले जाते.

रसवंतीगृहांना सुगीचे दिवस

रात्री थंडी आणि दिवसभर उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत. फेब्रुवारी संपला असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दिवसभर ऊन असल्याने शहरातील चौकाचौकासह राष्ट्रीय महामार्गांवर व तालुक्यातील बसस्थानक परिसरात बाजाराच्या ठिकाणी रसवंतीगृहाची घुंगरे वाजू लागले आहेत. फेब्रुवारीनंतर लग्नसराईचा काळ देखील सुरू होते.

त्यामुळे लोक खरेदीसाठी दुपारच्या वेळात बाहेर पडतात आणि मग खरेदीनंतर थंडगार रस प्यायला आपोआपच पावले रसवंतीगृहाकडे वळतात. रसवंतीच्या माध्यमातून संपूर्ण उन्हाळा भर रोजगार मिळत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर अनेक बेरोजगार युवकांनी रसवंतीची दुकाने थाटली आहेत.

टॅग्स :Jalgaonsummerhealth