विशेष अर्थसाहाय्य योजनेची मदत रखडली; वृद्धांची होतेय परवड

विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा वेतन दिले जाते.
senior citizen
senior citizenesakal

जळगाव : विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा वेतन दिले जाते. मात्र गत एप्रिल महिन्यांपासून हे वेतन रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आधीच तुटपुंजी मदत मिळत असून त्या मदतीसाठीही शासनदरबारी लाभार्थ्यांना अक्षरश: चकरा माराव्या लागत आहेत.

शासनाकडून वृध्द, निराधार, विधवा व्यक्तींना विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तिवेतन योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य केले जाते. अत्यंत उदात्त हेतुने सुरू असलेल्या योजनेला मात्र गत दीड महिन्यांपासून खीळ बसला असल्याची माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यांपासून लाभार्थ्यांना वेतनच अदा करण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य शासनाकडून विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत दोन महिन्यांपासून मासिक वेतन मिळाले नसल्याने लाभार्थ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना नाहक मनस्तापही सहन करावा लागत असून वेतन नेमके मिळणार कधी ? याची माहिती देखिल त्यांना मिळत नाही.

senior citizen
ज्येष्ठांशी कोणी गोड बोलून घेतला घराचा ताबा तर कोणी बळकावली जमीन

अशी आहे लाभार्थी संख्या

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना--१ हजार ७७०

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन-- ५५४

श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन-- ९० हजार १२७

संजय गांधी निराधार अनुदान योजना-- ६३ हजार २५

इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना-- ९३ हजार ५८६

इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना- १४ हजार ९६०

senior citizen
'सकाळ' इम्पॅक्ट : महामार्गाला पडलेले तडे भरण्याचे काम सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com