Jalgaon News : खासदार शिंदे फाउंडेशनची ‘ती’ रूग्णवाहीका चालू स्थितीत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ambulance

Jalgaon News : खासदार शिंदे फाउंडेशनची ‘ती’ रूग्णवाहीका चालू स्थितीत?

जळगाव : खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) फाउंडेशनची कार्डीयाक रूग्णवाहीका पंक्चरच्या तांत्रिक बिघाडामुळे थांबली होती. ती रूग्णवाहीका चालू स्थितीत असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) वैद्यकीय मदत कक्षाने केला आहे. (Shiv Sena Shinde group medical aid room claims that MP Shrikant Shinde Foundation cardiac ambulance is in working condition jalgaon news)

‘खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनची रूग्णवाहीका आजारी’या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याबाबत खुलासा करताना शिवसेना (शिंदे गट) वैद्यकिय मदत कक्षाचे राज्याचे संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी यांनी म्हटले आहे, कि बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यातर्फे गरीब रूग्णांना मदत करण्यात येत आहे.

याच अंतर्गत ही रूग्णवाहीका सुरू करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रूग्णांना घेवून जाण्यासाठी रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात येते. रूग्णवाहीका पंक्चर झाल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती बंद होती. ही रूग्णवाहीका सध्या चालू स्थितीत आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

नागरिकांनाही सेवा देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वैद्यकीय मदत कक्षातर्फे जिल्हा रूग्णालयाजवळील पांडे चौक, राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे मदत कक्षाचे संपर्क कार्यालय आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य सुरू आहे. गरजूंनी मदत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहनही गवळी यांनी केले आहे.