
Jalgaon Political News : शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्षांचा राजीनामा
Jalgaon News : बाजार समितीत भाजप- शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलचा पराभव झाला. त्याची जबाबदारी स्वीकारून शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी तालकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Shiv Sena Shinde group taluka president Resignation jalgaon news)
जळगाव बाजार समितीवर शिवसेना शिंदे गट व भाजपची सत्ता होती. या वेळी बहुमतासह सत्तेची अपेक्षा होती. महाविकास आघाडीकडून शिवसेना शिंदे गट व भाजपचा पराभव झाला. शिवसेना शिंदे गट व भाजप युतीला केवळ सहा जाग मिळाल्या.
या पराभवाची जबाबदारी स्वीकारून शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण (कानळदा ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
याबाबत नीलेश पाटील यांनी सांगितले, की राजेंद्र चव्हाण यांचा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा आपल्याला मिळला आहे. आपण तो मंजुरीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठविला आहे. याबबात ते निर्णय घेणार आहेत.