गाळेधारकांनी भरली ५० लाखांची थकबाकी

गाळेधारक संघटनेकडूनही पैसे भरण्याचे आवाहन
गाळेधारकांनी भरली ५० लाखांची थकबाकी
गाळेधारकांनी भरली ५० लाखांची थकबाकीsakal

जळगाव : जळगाव शहर महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या अव्यावसायिक संकुलातील गाळेधारकांकडून गाळेभाडे थकबाकी भरणा सुरू केला असून, सोमवारी (ता. २५) विविध संकुलांतील गाळेधारकांनी ५० लाख रुपये भरले आहेत. तसेच गाळेधारक संघटनेकडून गाळेधारकांना पैसे भरण्याचेदेखील आवाहन करण्यात आले आहे.

गाळेधारकांनी भरली ५० लाखांची थकबाकी
बाबा रामदेव अडचणीत! अॅलोपॅथी विरोधातील वक्तव्य भोवणार

जळगाव शहरातील मुदत संपलेल्या महापालिकेच्या मालकीच्या संकुलांतील गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित होता. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला. तसेच थकबाकीपैकी ५० ते २५ टक्के रक्कम भरण्याच्या सूचना गाळेधारकांना केल्या होत्या. त्यानुसार गाळेधारक संघटनेच्या आवाहनानुसार गाळेधारक आलेल्या गाळेभाड्यापैकी २५ टक्के रक्कम भरणे सुरू केले आहे.

त्यानुसार सोमवारी उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याकडे जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या उपस्थितीत विविध गाळेधारकांचा ५० लाखांचा धनादेश जमा केला, तसेच संघटनेकडून गाळेधारकांना थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्ष बंडू काळे, तेजस देपुरा, युवराज वाघ, सुरेश पाटील, पंकज मोमाया, रमेश तलरेजा, रिजवान जागीरदार, नंदू सोनार, अविनाश भोळे, सुरेंद्र चव्हाण, दिलीप साळुंखे, राम जगताप आदी गाळेधारक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com