
Jalgaon Crime News : भुसावळ हादरले...! नराधम मुलाने केला जन्मदात्या आईसह पत्नीचा खुन....
Jalgaon Crime News : घरगुती भांडण विकोपाला गेल्याने संतापलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या जन्मदात्या आईसह पत्नीचा धारदार शस्त्रासह लोखंडी तवा डोक्यावर मारून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील सानेगुरुजी नगरात मंगळवारी (ता. २३) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. (son murders wife and mother jalgaon crime news)
दरम्यान, याच घटनेत आणखी एकाची प्रकृती गंभीर असून, त्यास वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
शहरातील राका कन्ट्रक्शन, शकुन इस्टेटच्या ध्वज अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक एस- १ मध्ये संशयित हेमंतकुमार भूषण (वय ३३, रा. पटना, बिहार) हा परप्रांतीय रेल्वे कर्मचारी गेल्या सात महिन्यांपासून एकटाच राहत होता. दरम्यान, मागील दहा ते बारा दिवसांपूर्वी हेमंतकुमार यांची पत्नी आराध्य भूषण (वय २३) व आई सुशिलादेवी (वय २३) हे त्याच्यासोबत राहायला आले होते.
दरम्यान, मंगळवारी (ता. २३) पहाटे साडेचारच्या सुमारास राका कन्ट्रक्शन, शकुन इस्टेटच्या ध्वज अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील एस -२ मधील भाडेकरू एस. अनिलकुमार याने सुरक्षारक्षकास बाजूच्या प्लॅटमध्ये जोरात भांडण सुरू असल्याबाबत माहिती दिली.
थोड्या वेळेनंतर संशयित हेमंतकुमारची आई सुशिलादेवी सुरक्षारक्षकाकडे पळत आली व माझ्या मुलाने सुनेला मारून टाकल्याची भेदरलेल्या अवस्थेत सांगत होती. दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक एस-१ मध्ये हेमंत भूषण आणि त्याचा शालक वृषभ दोन्ही रक्तभंबाळ झालेले एकमेकांना पकडून उभे होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नंतर वृषभ सुरेंद्रकुमार साहू हा जखमी अवस्थेत खाली पळाला. त्या दरम्यान त्यांच्यावरही लोखंडी टोकदार हत्याराने व लोखंडी तव्याने तीन वेळा वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार एवढ्याच न थांबता संशयिताने त्याची पत्नी आराध्य हेमंतकुमार यास लोखंडी धारदार शस्त्राने वार करणे सुरूच ठेवले. तब्बल तीन वेळा वार करण्यात आले. ती मृत झाल्यानंतरही तिच्या डोक्यावर दोन वेळा संशयिताने लोखंडी तव्याने वार केले.
जन्मदात्रीही रक्ताच्या थारोळ्यात
संशयित हेमंतकुमार याने त्यांच्या जन्मदात्या आई सुशिलादेवी श्रवणकुमार हिच्यावर लोखंडी तव्याने दोन वेळा वार केल्याने काहीवेळपर्यंत हृदयाचे ठोके सुरू होते. गंभीर जखमी असलेला हेमंतकुमारचा शालक वृषभ व सुशिलादेवी या दोघांना जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दरम्यान सुशिलादेवी यांचा मृत्यू झाला तर शालक वृषभ हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
संशयितास अटक
सुरक्षारक्षक सुनील गंगाराम मोरे (वय ४९, रा. गंगाराम प्लॉट, गौतमनगर भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हेमंतकुमार भूषण यास पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक गोपाल गव्हाळे तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, हरीश भोये यांनी भेट दिली.