St Worker Strike : नवीन चालकांच्‍या हाती ‘स्टिअरिंग’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

St Worker Strike : नवीन चालकांच्‍या हाती ‘स्टिअरिंग’

St Worker Strike : नवीन चालकांच्‍या हाती ‘स्टिअरिंग’

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्‍या पंधरा दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. कर्मचारी मागे हटत नसल्‍याने बससेवा पूर्ववत करण्यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना रविवारी (ता. २१) एसटीचे स्टिअरिंग हाती दिले. याला विरोध झाला मात्र बराच वेळ झालेल्‍या गोंधळानंतर धुळ्यासाठी पहिली बस रवाना झाली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी जवळपास पंधरा दिवसांपासून संपावर आहे. यामुळे बससेवा थांबलेली आहे. यात, एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडगा निघत नसल्‍याने कर्मचारी संप मागे घेत नसून ठाम आहे. यामुळे अद्यापपर्यंत आंदोलन सुरूच आहे. मात्र, रविवारी पोलिस बंदोबस्‍तात सेवा सुरू झाली.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

धुळे बसनंतर अन्‍यत्र बस सुरू

एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे चालक भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील सात चालक कम वाहक उमेदवारांना कामावर बोलावून रविवारी जळगावातून एसटी महामंडळाने सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज तब्‍बल १५ दिवसानंतर दुपारी दीड वाजेच्‍या सुमारास जळगावहून धुळ्यासाठी पहिली बस (क्र. एमएच २०, बीएल ३९३६) जळगाव आगारातून बाहेर पडली. यानंतर भुसावळ, धरणगाव, एरंडोल, शेंदुर्णी या ठिकाणी बस सोडल्‍या. एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असताना प्रतीक्षा यादीतील चालक, वाहकांच्या तातडीच्या नियुक्तीला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला. बस जाऊ देणार नाही; यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठिय्या मांडला होता. यात मनसेचे कार्यकर्तेदेखील काही सहभागी झाले होते. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चर्चा केली. ही चर्चा संपल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेतला; परंतु, कर्मचाऱ्यांनी विरोध कायम ठेवला होता.

हेही वाचा: टीम इंडियाकडून ब्लॅक कॅप्सला व्हाइट वॉश!

धुळे बस एरंडोलहून परत

जळगाव बसस्‍थानकातून आज दुपारी पोलीस बंदोबस्तात बस सोडली. एसटी महामंडळाची जळगाव– धुळे ही बस एरंडोल येथे पोहोचल्यानंतर येथे मनसेच्‍यावतीने अडविली. बसला पुढे जाऊ न देता पुन्हा जळगाव येथे परत पाठविली. नवीन कर्मचारी यांना समजावण्यात आले. यानंतर बस पुन्‍हा जळगावकडे रवाना झाली.

‘प्रवाशांच्‍या सुविधेसाठी आजपासून बससेवा सुरू केली. याकरीता प्रतीक्षा यादीतील सात जणांना चालक कम वाहक म्‍हणून रुजू करत धुळ्यासह जिल्‍ह्यातील अन्‍य मार्गावर बस सुरू केली. टप्‍प्‍याटप्‍प्‍याने ही सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्‍न आहे.’

– भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, रा.प.महामंडळ जळगाव विभाग

loading image
go to top