Jalgaon Crime News : स्टेट बँक दरोड्याचा तपास मुंबईच्या दिशेने; 36 तास उलटून हाती भोपळा! | State Bank robbery case 3 investigation teams left for Mumbai jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sbi bank robbery jalgaon news

Jalgaon Crime News : स्टेट बँक दरोड्याचा तपास मुंबईच्या दिशेने; 36 तास उलटून हाती भोपळा!

Jalgaon Crime News : शहरातील कालिंका माता चौक स्टेट बँक दरोडा प्रकरणात तीन तपास पथके मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. या प्रकरणात बँकेचा शिपाई आणि एक ज्येष्ठ नागरिक (संशयित दरोडेखोराचा पिता) अशा दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. (State Bank robbery case 3 investigation teams left for Mumbai jalgaon crime news)

शहरातील कालिंका माता चौक स्टेट बँकेच्या शाखेत शुक्रवारी (ता.१) भरदिवसा दोन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सतरा लाखांची रोकड आणि तीन कोटींचे सोने असा ऐवज लुटून नेला होता.

गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखा, शनिपेठ पोलिस ठाणे आणि परीविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक यांची विविध पथके तपासात व्यस्त असून, दरोड्याच्या गुन्ह्यात बँकेचा शिपाई सूर्यवंशी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला संशयित म्हणून पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांची स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक कसून चौकशी करत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची दोन आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. मोबाईल, हेल्मेट सापडले बँकेत दरोडा टाकल्यानंतर दोघा हेल्मेटधारी दरोडेखोरांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धाव घेतली. तेथून पळून जात असताना नाल्यात पाच मोबाईल, एक हेल्मेट फेकून दरोडेखोर पसार झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सापडलेले मोबाईल बँकेचे मॅनेजर राहुल महाजन, नयन गीते यांच्यासह पाच लोकांचे असल्याची खात्री झाली आहे. दरोडा टाकून पळताना संशयितांनी सर्वांचे मोबाईल घेऊन पळ काढला होता. तांत्रिक तपासाला अडचणी बँकेत सकाळी साडेनऊला दरोडा टाकून लूट करणारे दरोडेखोर मुळात हेल्मेट घालून आले होते.

ज्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल ते हिसकावून घेऊन गेले, ते नाल्यात फेकून देण्यात आले. पळून जाणाऱ्या दोघा दरोडेखोरांनी गुन्हा करताना संपूर्ण खबरदारी घेतली असून, स्वतःच्या गाडीचा वापरही टाळलेला आहे.

त्याचप्रमाणे दोघा दरोडेखोरांनी मोबाईलचा वापर टाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, या गुन्ह्यात तांत्रिक तपासात प्रचंड अडचणींचा सामना तपास पथकाला करावा लागत आहे.

स्थानिक संशयितांचा सहभाग भरवस्तीत असलेल्या कालिंका माता चौक स्टेट बँक शाखा मुळात ज्या वास्तूमध्ये आहे, त्या इमारतीमध्ये बारीक बोळीच्या शंभर फूट मागे जावे लागते.

नंतर बँकेचे मुख्य दार येते. ज्याला ही शाखा माहिती आहे आणि जो वारंवार या बँकेत येऊन गेलेला असेल. तोच सहसा या ठिकाणी पोहोचू शकतो.

अन्यथा सामान्य माणसाला परिसरातील रहिवासी वगळता इतर कोणालाही सहजासहजी इथे बँक असेल, असे समजत नाही. अर्थात सहभागी संशयितांनी मागे गेल्या आठ ते दहा दिवस या परिस्थितीचा संपूर्ण सखोल आणि बारकाईने अभ्यास केला आहे.

मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर बँकेतील बैठक व्यवस्था, कॅश रूम, मुख्य तिजोरी, बँक मॅनेजरची बसण्याची जागा, कोण किती वाजता बँकेत दाखल होतो, याची इत्थंभूत माहिती दरोडेखोरांकडे होती.

या दरोड्यात बँकेतील निगडित कोणीतरी एक व्यक्ती आणि जळगाव शहरातील स्थानिक गुन्हेगारांपैकी लोकांनी या दरोडेखोरांना मदत केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

दरोडेखोरांना मदत करणारी व्यक्ती एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांपैकी असल्याची शक्यता आहे. त्या दिशेने एक पथक तपासात व्यस्त आहे.

पथके मुंबईत दाखल

कालिंका माता चौक स्टेट बँकेत दरोडा टाकल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पळून गेलेले दोघे दरोडेखोर मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली असून, एक पथक मुंबईत दाखल झाले आहे.

उर्वरित दोन पथके मार्गात आहेत. ताब्यात घेतलेला बँकेचा शिपाई सूर्यवंशी आणि इतर एकाच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :JalgaoncrimerobberySBI