जळगाव केंद्रातून इंदूरचे ‘डहूळ’ प्रथम

‘ब्लडी पेजेस’ द्वितीय; दोन्ही नाटके अंतिम फेरीत
State Drama Competition Indore Dahul first from Jalgaon
State Drama Competition Indore Dahul first from Jalgaon sakal

जळगाव : शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून नाट्यभारती, इंदूर या संस्थेच्या ‘डहूळ’ हे नाटक प्रथम ठरले. तर मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव या संस्थेच्या ‘ब्लडी पेजेस’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

अन्य निकाल पुढीलप्रमाणे

समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडे या संस्थेच्या महापात्रा या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन : प्रथम श्रीराम जोग (नाटक- डहूळ), द्वितीय वैभव मावळे (ब्लडी पेजेस ),

प्रकाश योजना : प्रथम अभिजित कळमकर (डहूळ), द्वितीय उमेश चव्हाण (ब्लडी पेजेस),

नेपथ्य : प्रथम अनिरुद्ध किरकिरे (डहूळ), द्वितीय दिनेश माळी (नाटक),

रंगभूषा : प्रथम योगेश लांबोळे (महापात्रा), द्वितीय प्रज्ञा बिऱ्हाडे (ब्लडी पेजेस)

उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक दीपक महाजन (ब्लडी पेजेस) व नेहा पवार (महापात्रा),

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : रूपा अग्रवाल (एक चौकोन विस्कटलेला), पूर्वा जाधव (महापात्रा), स्वप्ना लिंबेकर- भट (माणूस नावाचे बेट), कांचन अटाळे (बळी), गायत्री ठाकूर (फक्त चहा), शरद भालेराव (दिशा), चंद्रकांत चौधरी (स्टे), हनुमान सुरवसे (सेल मोबाईल आणि...), अनिल कोष्टी (सोडी गेला बाबा), योगेश शुक्ल (वेग्गळं असं काहीतरी).

किशोर डाऊ (नागपूर), ईश्वर जगताप (नाशिक) आणि मीनाक्षी केंढे (पुणे) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आणि जळगावचे राज्य नाट्य समन्वयक दीपक पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com