State Kabaddi Competition : जळगावात रंगणार राज्‍यस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धांचा थरार

State Kabaddi Competition
State Kabaddi Competitionesakal

जळगाव : महाराष्ट्र राज्‍य असोसिएशन व जळगाव जिल्‍हा कबड्डी असोसिएशनतर्फे २१ व्‍या राज्‍यस्‍तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्‍पर्धा ११ ते १४ मार्चदरम्‍यान खेळविल्‍या जाणार आहेत. यंदा स्पर्धेचे यजमानपद जळगावला मिळाल्याची माहिती जिल्‍हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह नितीन बरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

State Kabaddi Competition
Sports Shoes For Women : क्वालिटीच दिसणार राव! असे स्पोर्ट्स शूज घातले तर मैत्रिणी जळून खाक होणार; पहा लिस्ट

शासनातर्फे १९९७ ला शिवशाही चषक कबड्डी स्‍पर्धा या नावाने स्‍पर्धेला सुरवात केली. २००२ पासून ही स्‍पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्‍पर्धा या नावाने सुरू झाली. यानंतर २१ वी स्‍पर्धा ११ ते १४ मार्चदरम्‍यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत प्रकाशझोतात खेळविल्‍या जाणार आहेत.

ही स्‍पर्धा राज्‍याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली होणार आहे. स्‍पर्धेत २० जिल्‍ह्यांतील पुरुष व महिलांचे मिळून ३२ संघांती ४४८ खेळाडू सहभागी होतील.

जळगावचा संघ नाही

स्‍पर्धेत स्‍थानिक जळगावचा संघ सहभागी होऊ शकलेला नाही. निवड चाचणी स्‍पर्धेत जळगावला मुंबई शहर, सांगली व रायगड संघाकडून पराभव स्‍वीकारावा लागल्‍याने जळगावचा संघ पात्र ठरला नाही.

State Kabaddi Competition
Nashik Sports News : क्रीडा स्पर्धांसाठी तरतूद 10 लाखांचा खर्च 18 लाख?

स्‍पर्धेत पुरुष गटात मुंबई शहर, सांगली, कोल्‍हापूर, अमरावती, अहमदनगर, नाशिक, पुणे, वाशिम, मुंबई उपनगर, धुळे, ठाणे, नागपूर, नांदेड, रत्‍नागिरी, नंदुरबार व वर्धा येथील संघ आहेत, तर महिला गटात पुणे, कोल्‍हापूर, रत्‍नागिरी, नागपूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, धुळे, अमरावती, नंदुरबार, ठाणे, रायगड, बुलढाणा, पालघर, नाशिक, नांदेड, अकोला येथील संघ सहभागी आहेत.

मैदानासाठी २५ ट्रॅक्‍टर माती

कबड्डी स्‍पर्धा या मॅटवर खेळविल्‍या जाणार आहेत. मात्र, मैदान सपाट करण्यासाठी खेडीभोकरी येथे सुरू झालेल्‍या पुलाच्‍या कामाच्‍या ठिकाणाहून २५ ट्रॅक्‍टर बारीक माती आणली आहे. मैदानावर माती टाकून सपाट करण्यात आल्‍याची माहिती नितीन बरडे यांनी दिली.

State Kabaddi Competition
Sports Job : नोकरी शोधणाऱ्या खेळाडूंसाठी आनंदाची बातमी ! SAIमध्ये भरती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com