Jalgaon MSRTC News : राज्य परिवहन महामंडळाचे सांघीक कार्य कौतुकास्पद : पालकमंत्री पाटील | State Transport Corporation Teamwork commendable Guardian Minister Patil Amrit Mahotsav of Transport Corporation Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil on the occasion of Amrit Mahotsav foundation day program of Transport Corporation.

Jalgaon MSRTC News : राज्य परिवहन महामंडळाचे सांघीक कार्य कौतुकास्पद : पालकमंत्री पाटील

Jalgaon News : गाव, वाड्या आणि वस्त्यांसह दुर्गम भागांना जोडण्याचे काम एसटीने केले आहे. आज प्रवासी वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असली, तरी लालपरीची महत्ता कायम आहे.

महिलांना प्रवासी भाड्यात दिलेली सवलत आणि उत्तम सेवेमुळे आता एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. जळगाव विभागाने अवघ्या एका महिन्यात तब्बल ४८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवून विक्रम केल्याची बाब कौतुकास्पद आहे. (State Transport Corporation Teamwork commendable Guardian Minister Patil Amrit Mahotsav of Transport Corporation Jalgaon News)

याचप्रकारे उत्तम सेवा बजावत हा पहिला क्रमांक कायम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

महमंडळाच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, कामगार अधिकारी कमलेश भावसार, उपअभियंता अजय पाटील, अर्चना भदाणे, दिलीप सांगळे, दीपक जाधव, डेपो मॅनेजर संदीप पाटील, विभागीय अभियंता निकष पाटील, वाहतुक अधिक्षक के. व्ही. महाजन, सांख्यिकी अधिकारी आर. टी. पवार, नरेंद्र चित्ते, विजय पाटील, विविध संघटनांचे पदाधिकारी आर. के. पाटील, विनोद चितोडे, नरेंद्रसिंग राजपूत, संजय सूर्यवंशी, राहुल पाटील, महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व्यासपीठावर होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील बससेवा अधिक सक्षम करण्यावर भर असून, जास्तीतजास्त नवीन बस उपलब्ध करून देणार आहे.

या वेळी त्यांच्या हस्ते गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. बस स्थानकातील बसमध्ये जाऊन प्रवासी, वाहक व चालकांचे पेढे भरून आणि गुलाबपुष्प देऊन पालकमंत्र्यांनी स्वागत केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गेल्या २५ वर्षांत एकही अपघात न करणाऱ्या वाहकांचा २५ हजाराचा धनादेश, शाल व नारळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. वाहक व विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही या वेळी सत्कार झाला. तब्बल ८९ वर्षे वय असलेले निवृत्त चालकही या वेळी उपस्थित होते.

माधुरी भालेराव, मनीषा निकम, शितल अहिरराव, सुषमा बोदडे, सुनिता सपकाळे, विद्या पाटील, सुनिता पाटील व संगीता भालेराव या आठ महिला चालकांनाही या वेळी गौरविण्यात आले.

कामगार अधिकारी कमलेश भावसार यांनी प्रास्ताविक केले. मेकॅनिक कारागीर प्रदीप दारकुंडे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल पाटील यांनी आभार मानले.