Chh Shivaji Maharaj Statue : शिवाजीनगरात शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारणार; आयुक्तांकडून पाहणी | statue of Shivaji Maharaj will be executed in Shivaji Nagar jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

While inspecting Chhatrapati Shivaji Nagar, Commissioner Dr. Vidya Gaikwad. Neighbors Sachin Narle, corporator Navnath Darkunde, former corporator Ankush Koli, Bhagwan Sonwane etc.

Chh Shivaji Maharaj Statue : शिवाजीनगरात शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारणार; आयुक्तांकडून पाहणी

Chh Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेला अर्धकृती पुतळा हलवून त्याच जागेवर मागील बाजूस हा पुतळा बसविण्यात येणार आहे.

त्याच्या कामाची वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी जागेची पाहणी केली. या ठिकाणी असलेला जुना पुतळा सन्मानपूर्वक लवकरच हलविण्याचा निर्णयही घेण्यात आला. (statue of Shivaji Maharaj will be executed in Shivaji Nagar jalgaon news)

छत्रपती शिवाजीनगरात नवीन उड्डाणपूल करण्यात आला, त्यामुळे या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर या ठिकाणी अश्‍वारूढ पुतळा उभारण्याबाबत महापालिकेने ठरावही मंजूर करण्यात आला आहे.

पुतळ्याबाबत चर्चा करण्यासाठी छत्रपती शिवाजीनगर मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. गायकवाड, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले यांनी शिवाजीनगरात भेट दिली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या जागेवर उभारण्यात येणार आहे त्याचीही पाहणी करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अर्धकृती पुतळा सन्मानपूर्वक हलविणार

गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन अश्‍वारूढ पुतळा मंजूर करण्यात आला आहे. त्यांची उंची सद्या असलेल्या पुलापेक्षा उंच असणार आहे. सद्यःस्थितीत असलेला पुतळा सन्मानपूर्वक हलविण्यात येईल.

तो सतरा मजली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत ठेवण्यात येइल. नवीन अश्‍वारूढ पुतळा उभारणीचे काम वेगाने करण्यात येईल. याबाबत इतर समस्यांवरही चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले आहेत. या वेळी शहर अभियंता चंद्रकात सोनगिरे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, माजी नगरसेवक अंकुश कोळी, सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनवणे, विजय राठोड, धंनजय चौधरी आदी उपस्थित होते.