Latest Marathi News | भुसावळ विभागांतर्गत रेल्वेगाड्यांना थांबा द्या : खासदार रक्षा खडसेंची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raksha khadse

भुसावळ विभागांतर्गत रेल्वेगाड्यांना थांबा द्या : खासदार रक्षा खडसेंची मागणी

मुक्ताईनगर : मध्य रेल्वे अंतर्गत भुसावळ विभागातील नांदुरा, मलकापूर, बोदवड, रावेर, निंभोरा व भुसावळ या रेल्वेस्थानकांवर प्रवासी रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी मंगळवारी (ता. २६)खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे -पाटील यांची दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे केली. (Latets Marathi News)

हेही वाचा: जळगाव नागरी पतपेढीचा भूखंड ताब्यात; महापालिकेची धडक कारवाई

कोविड-१९ महामारीमुळे काही महिने रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोविडचे प्रमाण कमी झाल्यावर काही रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु त्यांना भुसावळ विभागातील भुसावळ रेल्वेस्थानक वगळता कोणत्याही स्थानकावर थांबा देण्यात आला नाही. तरी प्रवाशांच्या मागणीप्रमाणे या रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी या वेळी रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे केली.

हेही वाचा: 'त्या' वसतिगृहाला सावरकरांचेच नाव; शाहू महारांजांच्या नावाची मागणी फेटाळली

मलकापूर स्थानक येथे पुणे-अमरावती-पुणे, नांदुरा स्थानक येथे जयपूर-हैद्राबाद, प्रेरणा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर-पुणे गरीबरथ, रावेर स्थानक येथे महानगरी एक्स्प्रेस निंभोरा स्थानक येथे राजधानी एक्स्प्रेस, बोदवड स्थानक येथे नवजीवन एक्स्प्रेस, सुरत-अमरावती-सुरत, आझाद हिंद एक्स्प्रेस तर भुसावळ स्थानक येथे राजधानी एक्स्प्रेस (टेक्निकल हॉल्ट) आदी प्रवासी रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार खडसे यांनी या वेळी रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे केली.

Web Title: Stop Trains Under Bhusawal Section Demand Of Mp Raksha Khadse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..