
Student Scholarship : विद्यार्थी शिष्यवृत्ती अद्यापही प्रलंबित; NSUI आयुक्तांना निवेदन
चोपडा : मागील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अजूनही प्रलंबित आहे. ती लवकर मिळावी, या आशयाचे निवेदन एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष अमीर शेख व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसयूआय प्रदेश सचिव चेतन बाविस्कर, कविता बोरसे, प्रतीक्षा सूर्यवंशी, प्रदीप नेरपगारे यांनी जळगाव समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की मागील शैक्षणिक वर्षाचा विचार केला असता ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती आली जरी असली तरी त्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. म्हणजेच तो शिक्षणासाठी लागणाऱ्या शुल्क अभावी शिक्षणापासून वंचित राहतो, मग त्या शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना फायदा होत नाही.
याबाबत तिचा प्रश्न आपण सरकारपर्यंत पोचवावा व मागील वर्षाच्या सर्व स्थगित असलेल्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोचवावी व विद्यार्थ्यांच्या समाधानी निर्णय घ्यावा; अन्यथा एनएसयूआयच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एनएसयूआयच्या वतीने देण्यात आला.
या वेळी निवेदनावर सरचिटणीस कविता बोरसे, प्रतीक्षा सूर्यवंशी, प्रदीप नेरपगारे, समन्वयक शुभम पाटील, सागर पाटील, गोपाल क्षीरसागर आदी विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.