Jalgaon News : ‘मंडी’तून विद्यार्थ्यांचे वाढणार व्यवसायज्ञान; रायसोनी महाविद्यालयात उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students getting business experience in the real market under Raisoni College's 'Mandi' initiative.

Jalgaon News : ‘मंडी’तून विद्यार्थ्यांचे वाढणार व्यवसायज्ञान; रायसोनी महाविद्यालयात उपक्रम

जळगाव : पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा आत्मविश्वास प्रबळ होईल.

‘मंडी’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना (Student) खरेदी-विक्री, व्यवहाराची माहिती व सखोल व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी नक्कीच मिळेल, असा विश्‍वास विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील यांनी व्यक्त केला. (Students getting business experience in real market under Raisoni College Mandi initiative jalgaon news)

रायसोनी महाविद्यालयात नुकत्याच राबविण्यात आलेल्या ‘मंडी’ उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी, छत्रपती संभाजीनगर येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणक विभागाचे प्रा. डॉ. एस. एन निंभोरे, विनले पॉलिमर्सचे संचालक कोरस संचेती व एमबीएचे माजी विध्यार्थी व दायमा मार्केटिंगचे संचालक राहुल दायमा या वेळी उपस्थित होते.

हा आहे उद्देश

उत्पादन विक्रीचे प्रत्यक्ष बाजारात जाऊन अनुभवात्मक शिक्षण देण्याचे काम प्राप्त व्हावे, या हेतूने महाविद्यालयात तीनदिवसीय ‘रायसोनी मंडी’ उपक्रम राबविण्यात आला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

या गोष्टींचा अनुभव

या उपक्रमात ‘लर्निंग बाय सेलिंग’चा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी घेतात. यातून अर्थशास्त्र, अकाउंट, नियोजन, डिसिजन मेकिंग यांसारखे विविध विषय शिकता येतात, तसेच शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर नोकरीची शोधाशोध व्हायला नको, विद्यार्थ्यांच्या अंगी आत्मविश्वास, नेतृत्व गुण, संवादकौशल्य विकसित होण्यासाठी हा उपक्रम मदतशीर ठरतो, असा विश्‍वास प्रा. प्रीती अग्रवाल यांनी व्यक्त केला. उपक्रमात २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा. राहुल त्रिवेदी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. तन्मय भाले यांनी आभार मानले.

टॅग्स :JalgaonstudentCollege