विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school uniforms

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश

भुसावळ (जि. जळगाव) : कोरोना (Corona) काळातील दोन वर्षे शाळा बंद होत्या. आता कोरोना नियंत्रणात असून, सरकारने सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे जून महिन्यापासून शहरासह तालुक्यातील सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील पहिली ते आठवीच्या ४ हजार ७३३ विद्यार्थ्यांना दोन नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. गणवेशासाठी तालुकास्तरावर २८ लाख ३९ हजार ८०० रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून प्रत्येकाच्या दोन गणवेशांवर ६०० रूपये खर्च होणार आहेत. याबाबत गट शिक्षण अधिकारी किशोर वायकोळे यांनी केंद्रप्रमुखांची बैठक घेतली.

शाळा १४ जूनपासून पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके व प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. तालुकास्तरावर त्यानुसार तयारी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी वायकोळे यांनी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांची बैठक घेतली. त्यात शहरासह तालुक्यातील प्रत्येक शाळांची माहिती मागविण्यात आली. तेथील मुख्याध्यापकांशी सुद्धा चर्चा करून पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्याबाबत सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल. ते विद्यार्थ्यांची यादी तयार करून गणवेश शिवून देण्यासाठी आधी कापड खरेदी करतील. नंतर गावातील एखादा टेलर शोधून विद्यार्थ्यांची मापे घेऊन गणवेश शिवून घेतील. त्यांचे पहिल्या दिवशी वाटप होईल.

हेही वाचा: चोऱ्या रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल हा कॅमेरा; किंमत फक्त....

दरपत्रकानुसारच काम करा

तालुक्यातील जिल्हा परिषद व शहरात पालिकेच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिला जाईल. या अनुषंगाने शिक्षण विभागाने शासनाकडे ४ हजार ७३३ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी अनुदानाची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार २८ लाख ३९ हजार ८०० रुपये निधी प्राप्त झाला. हा निधी मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या दोन गणवेशावर ६०० रूपये खर्च होईल, अशी माहिती देण्यात आली.

हेही वाचा: धक्कादायक! 11 वर्षांपासून जन्मदात्या बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

Web Title: Students Will Receive Uniforms On The First Day Of School

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top