नायब तहसीलदार धनश्री पवारांची यशोगाथा; साकारले बालपणीचे स्वप्न!

बालपणी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवतानाची मेहनत अन् धेय गाठण्याचा ध्यास यातून आपल्यासमोर येतो.
Success story
Success storyesakal

जळगाव : स्पर्धा परिक्षा देवून अधिकारी बनण्याचे स्वप्न मी बालपणीच पाहिले होते. आई- वडिलांनी लहानपणापासून शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. स्पर्धा परिक्षेसाठी पुण्यात जाऊन अभ्यास न करता घरी राहून स्वयंअध्ययनावर अधिक भर दिला. इंजिनिअरिंग नंतर चांगल्या कंपनीमध्ये असलेली नोकरी सोडून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. आई- वडिलांनी पाठिंबा दिला. लग्नानंतर घर सांभाळून अभ्यासात सातत्य ठेवण्यात अडचणी येतात, मात्र स्पर्धा परीक्षा पास होण्याचे ध्येय सोडले नाही. आई- वडील, सासू- सासरे व पती ह्यांचा प्रोत्साहनामुळे मी राज्यसेवा आयोगाची २०२० ची परिक्षा उत्तीर्ण झाले अन नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे ती नवनियुक्त नायब तहसीलदार धनश्री पवार यांची.

सेल्फ स्टडी, अभ्यासात सातत्य, जिद्दीने मिळविले यश

धनश्री पवार सांगतात स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होण्याच्या ध्येयाने मी २०१८ ला पूर्व परिक्षा दिली, मुख्य परिक्षा दिली. मात्र इंटरव्ह्यू देता आला नाही. २०१९ ला पूर्व, मुख्य परिक्षा उत्तीर्ण झाले, मुलाखतही झाली मात्र पोस्ट मिळाली नाही. यामुळे पुन्हा २०२० ला परिक्षा दिली. यात यश मिळाले अन् नायब तहसीलदारपदी नियुक्तीही मिळाली. लग्नापूर्वी स्पर्धा परीक्षेचा एक अटेंम्प्ट दिला होता. लग्न झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी सांभाळून परिक्षेच्या अभ्यासात सातत्य राहत नाही. मात्र पती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी मला अभ्यासासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. गडचिरोली येथील भामरागड सारख्या अतिदुर्गम भागात त्यांची पोस्टिंग होते. तेथेच मी अभ्यास केला. तेही स्पर्धा परिक्षेतूनच अधिकारी झाले आहेत. त्यांच्या अनुभवातून मी खूप शिकले. स्पर्धेचे युग आहे. प्रचंड स्पर्धा आहे. त्यात आपल्याला यश मिळेल की नाही याबाबत शंका, कुशंका येतेच. मात्र मी निर्णयावर ठाम होते. अभ्यासात सातत्य ठेवले. प्रश्नांचा भरपूर सराव केला. पुण्यात स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यासिका, क्लासेस असतात. तेथे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वातावरण असते. परंतु मी घरी राहून स्वयंशिस्त, स्वयंअध्ययनावर भर दिला.शालेय जीवनात अभ्यासात सातत्यामुळे मी चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत मी राज्यात बारावी आली होती. नागपूरला इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर Larsen and toubro ह्या खासगी कंपनीत जॉब केला. तेव्हा स्पर्धा परिक्षा देण्याची महत्वाकांक्षा अधिक निर्माण झाली. आणि ती पूर्णही केली.

Success story
HSC Result : गवंडी काम करणारा विद्यार्थी जेंव्हा बारावी पास होतो...

''स्पर्धा परिक्षा देवू इच्छिणाऱ्यांनी पदवी झाल्यानंतर प्लॅन ‘बी’ तयार ठेवावा. परिक्षेसाठी भरपूर मेहनत करावी. अपयश आले तरी न डगमगता, मनाने न हारता प्रयत्न सुरूच ठेवावे. यश नक्की मिळते.'' - धनश्री पवार, नायब तहसीलदार.

Success story
करिअरच्या वाटेवर : मूलभूत अभियांत्रिकी शाखा : रोजगाराचे सोपान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com