Jalgaon News : कळमसरेत विवाहितेची आत्महत्या | Suicide of married women in Kalamsare jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon News : कळमसरेत विवाहितेची आत्महत्या

Jalgaon News : येथील विवाहिता रोहिणी प्रमोद निकम (वय २२) यांनी राहत्या घरातील स्वयंपाक घराच्या खोलीत छतावरील पंख्याला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) दुपारी एकच्या सुमारास घडली. (Suicide of married women in Kalamsare jalgaon news)

येथील रहिवासी प्रमोद बापू निकम यांचा ग्राहक सेवा केंद्राचा व्यवसाय आहे. ते दुपारी घरी आले असता, त्यांना दरवाजा लावलेला आढळल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली. मात्र, घरातून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मागील बाजूस जाऊन पाहिले असता, पत्नी छताच्या पंख्याला लटकलेली दिसली.

त्यांनी शेजारच्यांना आवाज देऊन बोलविले व तत्काळ रोहिणी यांना खाली उतरवून अमळनेर येथील खासगी दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रोहिणी यांना दोन वर्षांचा मुलगा आहे.

याबाबत मारवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, रोहिणी निकम यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.