Summer Season News : ‘उष्माघात’ सदृश लक्षणांनी वडगाव येथील मुलाचा मृत्यू | Summer Season Death of a boy from Vadgaon due to heat stroke like symptoms Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Summer Season News : ‘उष्माघात’ सदृश लक्षणांनी वडगाव येथील मुलाचा मृत्यू

Jalgaon News : येथून जवळच असलेल्या वडगाव बुद्रुक येथील १३ वर्षीय मुलाचा उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघात सदृश लक्षणांनी मृत्यू झाला.

ही घटना शनिवारी (ता. २६) घडली. मुलाच्या मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Summer Season Death of a boy from Vadgaon due to heat stroke like symptoms Jalgaon News)

जळगाव जिल्हा तापमानात अव्वल ठरला आहे. यामुळे सध्या लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांना उन्हाचा त्रास जाणवत आहे.

अशातच उन्हाचा तीव्रतेमुळे वडगाव बुद्रुक येथील भावेश बाळू पाटील (वय १३) या मुलाची शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी अचानक तब्बेत बिघडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याला ताप, उलट्या होऊ लागल्याने शनिवारी सकाळी उपचारार्थ अडावद येथे आणत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला.

तो शुक्रवारी दिवसभर शेताकडे उन्हात फिरल्यानेच त्याला उष्माघात झाला असावा, असा अंदाज त्याच्या परिवाराने वर्तविला आहे.

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :Jalgaondeadsummer