
Jalgaon Crime News : पिस्तूल, काडतूस घेत दहशत माजविणाऱ्याला अटक
जळगाव : हातात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन वरणगाव शहरात दहशत माजविणाऱ्या संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.२१) रात्री दहाला अटक केली. (Suspect who terrorized village pistol live cartridge in hand arrested by local crime branch team jalgaon crime news)
त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उदय राजू उजलेकर (२२, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, वरणगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
वरणगाव शहरात संशयित उदय उजलेकर हा विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेवून दहशत माजवीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्यांनी मंगळवारी (ता.२१) पथकाला त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख, दीपक पाटील, महेश महाजन, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, रवींद्र पाटील, मुरलीधर बारी यांनी रात्री दहाला वरणगाव शहरात सापळा रचून संशयित उदय राजू उजलेकर याला अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस हस्तगत केले आहे.