शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या T आकाराचे काम लवकरच...

शिवाजीनगर पुलाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची दिरंगाई होत असतानाच महामार्ग विभागाने दुसऱ्या टप्प्यासाठी पत्र दिले आहे.
Shivajinagar,Pune Flyover Bridge News
Shivajinagar,Pune Flyover Bridge Newsesakal

जळगाव : शिवाजीनगर पुलाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची दिरंगाई होत असतानाच महामार्ग विभागाने दुसऱ्या टप्प्यासाठी पत्र दिले आहे. ‘टी’ आकाराचा पूल करण्यासाठी शिवाजीनगर भागातील जागा मोकळी करून द्यावी असे पत्र महापालिकेला दिले आहे.(Shivajinagar, Pune Flyover Bridge News)

शिवाजीनगर नवीन पुलाचे काम सुरू झाल्यापासूनच वाद सुरू आहे. या पुलाचे काम ‘टी’ आकाराचे करण्याचा नकाशा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंजूर करण्यात आला होता. त्यानुसारच त्याची रक्कमही मक्तेदाराला मंजूर करण्यात आली आहे. मात्र ‘टी’ आकाराला स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात आला, तो ‘वाय’ आकारातच करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली, तर काही स्थानिक लोकांकडून हा पूल ‘टी’ आकारातच करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्याबाबत जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. हा वाद लक्षात घेउन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्कालीन स्थितीत ‘वाय’आकारात काम करून त्यानंतर ‘टी’ आकाराचा निर्णय घ्यावा असे सांगितले. त्यामुळे सद्य:स्थितीत ‘टी’ आकाराचे काम थांबवून ‘वाय’ आकारात पूल करण्याचे काम मक्तेदाराने सुरू केले. मात्र ‘वाय’ आकाराच्या पुलाच्या कमालीची मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत गेली, आज तीन वर्षे झाली तरी ‘वाय’ आकाराचा हा पूल पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र आता जिल्हाधिकारी यांनी नुकतीच पाहणी केली, जूनअखेर हा पूल वाहतुकीस सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे या पुलाचे कामही मक्तेदाराने वेगात सुरू केले आहे. त्यामुळे पुलाचा पहिला टप्पा जूनअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

Shivajinagar,Pune Flyover Bridge News
भावाने मोबाईल पाहू नको सांगितल्याने बहिणीची आत्महत्या

T आकारासाठी मनपास पत्र

मक्तेदाराने पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्पा ‘टी’ आकारास सुरूवात होणार आहे. असे महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नकाशानुसार ‘टी’ आकाराचा पुलाचा भाग शिवाजीनगरातील टी. टी. सांळुखे चौकाकडे आहे. या भागाकडील मार्गावरील कामाचे अडथळे दूर करून द्यावेत असे पत्र महामार्ग विभागाने महापालिकेकडे दिले आहे. शिवाजीनगर भागाकडील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण विभागास कळविण्यात आले आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर या भागाचे काम सुरू करण्यात येईल, त्यासाठी आवश्‍यक तो निधी उपलब्ध असून नकाशानुसार पुलाचे काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे दिसत आहे.

Shivajinagar,Pune Flyover Bridge News
घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्याला अटक

''शिवाजीनगर पुलाचा नकाशा ज्याप्रमाणे आहे, त्याच प्रमाणे काम करण्याचे आमच्याकडे आदेश आहे, त्याबाबत शासनाचे कोणतेही नव्याने आदेश नाहीत, त्यामुळे ‘टी’ आकाराचे काम करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण आम्हास काढून द्यावे, असे पत्र आम्ही महापालिकेस दिले आहेत. त्याप्रमाणे त्यांनी आम्हास हा रस्ता मोकळा करून द्यावयाचा आहे.'' - प्रशांतकुमार येळई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com