St Worker Strike : दगडफेकीची दहशत; नवीन चालकांनी सोडले स्टिअरिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

St Worker Strike

St Worker Strike : दगडफेकीची दहशत; नवीन चालकांनी सोडले स्टिअरिंग

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी बेमुदत संपावर असल्‍याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्‍त करत बससेवा सुरू केली. मात्र बसवर झालेल्‍या दगडफेकीने नवीन चालकांनी देखील एसटीचे स्टिअरिंग सोडून दिले. यामुळे आज दिवसभरात एकदेखील बस बाहेर पडली नाही.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी पंधरा दिवसांपासून संपावर आहे. यामुळे बससेवा थांबलेली आहे. परंतु, बससेवा सुरळीत करण्यासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्‍या उमेदवारांना संधी देखील रविवारी पोलिस बंदोबस्‍तात सेवा सुरू केली. मात्र ही सेवा दुसऱ्या दिवशी कोलमडली आहे,

बससेवा सुरळीत करण्याच्‍या हेतूने भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असलेल्‍या उमेदवारांना महिनाभराची तात्‍पुरती नियुक्‍ती देत सेवा सुरू केली. मात्र जळगाव बसस्थानकातून सोडलेली धुळे बस एरंडोल येथे अडवून परत पाठविली. तर चोपडा मार्गस्‍थ झालेल्‍या बसवर ममुराबाद येथे अज्ञातानी दगडफेक केली. यामुळे नवीन नियुक्‍त झालेल्‍या चालकांमध्‍ये भिती निर्माण झाली. या भीतीपोटी ते चालक आज ड्युटीवर आलेच नाही.

loading image
go to top