Latest Marathi News | हिंमत असेल तर बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thackeray Group

हिंमत असेल तर बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवा! : संजय सावंत

जळगाव : शिवसेनेशी दगाफटका करून गेलेले गद्दार नेते आहेत. मात्र, मूळ शिवसैनिक सेनेसोबतच आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवावा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करतानाच गद्दारांनी हिंमत असेल तर बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे, असे आव्हान संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिले.

सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी शिवसेना, उद्धव ठाकरे गटाचा मेळावा झाला, त्यात श्री. सावंत बोलत होते. व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे, अरविंद नाईक आदी उपस्थित होते.(Thackeray Melawa Sanjay Sawant Statement Jalgaon News)

हेही वाचा: Forest Department Update : 5 लाख रुपये किंमतीचे सागवानी लाकूड वनविभागाकडून जप्त

या वेळी मार्गदर्शन करताना श्री. सावंत म्हणाले, की येणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पेटून उठत कामाला लागावे. आपल्याला मिळालेले मशाल चिन्ह घराघरात पोचवावे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा असेल तर तो त्यांनी कसाही वाढवावा, पण आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, खोट्या गुन्ह्यात अडकवले तर गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही देत गद्दारांना पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावेत, असे आवाहन सावंत यांनी केले.

महिला आघाडीप्रमुख महानंदा पाटील, विष्णू भंगाळे, जयश्री महाजन, कुलभूषण पाटील यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास गजानन मालपुरे, युवासेनाप्रमुख नीलेश चौधरी, पीयूष गांधी उपस्थित होते. प्रशांत सुरळकर यांनी सूत्रसंचालन केले. उमेश चौधरी यांनी आभार मानले. मेळाव्यास ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: Diwali Special : दिवाळी किटचे 6 लाख लाभार्थ्यांना वाटप सुरू