esakal | लग्नाची वरात आणि ‌ १६ लाख चोरट्यांच्या खिशात ! 
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाची वरात आणि ‌ १६ लाख चोरट्यांच्या खिशात ! 

दोन लहान मुलेच कुणाच्या ओळखीची नव्हती. संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी दोन लहान मुलांसह चोरट्याचे फोटो शूटिंग ताब्यात घेतले आहे.

लग्नाची वरात आणि ‌ १६ लाख चोरट्यांच्या खिशात ! 

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव ः भुसावळ रोडवरील एका हॉटेलमध्ये झालेल्या लग्नातून नवरीचे अडीच लाख रुपये व सोन्याचे दागिने असा १६ लाख १० हजारांचा ऐवज चोरीला गेला. दोन लहान मुलांच्या माध्यमातून चोरट्यांच्या टोळीने हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

रावेर येथील बाविसे गल्लीतील रहिवासी प्रगतिशील शेतकरी, व्यावसायिक युवराज नेमाडे (वय ५३) यांच्या मुलीचे लग्न जळगावला एका हॉटेलमध्ये झाले. नेमाडे परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी, कुटुंबकबिल्यासह एक दिवस अगोदरपासून जळगावला आले होते. नवरीचे सर्व दागिने तिच्या मावशीकडे सांभाळायला ठेवण्यात आले होते. 

लहान मुलांद्वारे चोरी 
गुन्ह्याचा प्रकार आणि पद्धत पाहता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि लग्नातील व्हिडिओ तपासला असता, चारही बाजूने सीसीटीव्हीने सज्ज सभागृहात लग्नात आलेल्या प्रत्येकाची ओळख पटविण्यात आली. पैकी केवळ एक व्यक्ती आणि त्याच्या इशाऱ्यावर काम करणारी दोन लहान मुलेच कुणाच्या ओळखीची नव्हती. संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी दोन लहान मुलांसह चोरट्याचे फोटो शूटिंग ताब्यात घेतले आहे. दागिन्यांची पिशवी लंपास होताच नेमाडेंनी पोलिसांत धाव घेतली. सहाय्यक निरीक्षक कुमार चिंथा, निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने पाहणी करून माहिती घेतली. 

सतरा मिनिटांत हातसफाई 
मोठ्या लग्नसमारंभात लूट करणारी संपूर्ण टोळी या कामात व्यस्त असते. नेमक्या वेळेत लहान मुलांमध्ये खेळता-खेळता चोरीसाठी ट्रेन मुले नवरीच्या जवळपास असणाऱ्यांचा अंदाज घेतात. खासकरून पर्स, बॅग सांभाळणारी व्यक्ती या मुलांची लक्ष्य असते, तेच नेमाडे यांच्या लग्नातही झाले. दुपारी १ः४३ ला चोरटे आत शिरले अन्‌ काम करून दोनच्या सुमारास गायब झाले. नवरीच्या मावशीला हेरत चोरट्यांनी काम फत्ते केले. 

असा ऐवज लंपास 
पिशवीत अडीच लाखांची रोकड, एक लाख रुपयांच्या दोन तोळ्याच्या दोन चेन, ५५ हजार रुपये किमतीची अंगठी, ५५ हजार किमतीची एक तोळ्याची चेन, चार लाख रुपये किमतीचा सोन्याचा हारसेट त्यात कानातील रिंगा, अंगठी, ब्रेसलेट, ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, चार लाखांच्या सोन्याच्या बांगड्या, ७० हजारांचे झुमके, ४२ हजारांची बिंदी, ४२ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅमचे कानातील लोमटे, एक लाख १२ हजार रुपये किमतीचे पेंडल असा एकूण १६ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image
go to top