जळगाव : महावितरण कंपनीच्या अल्यूमिनीअम तारांची चोरी

शेतातील डीपीवरून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनिअम तारांची चोरी केल्याची घटना घडली.
 Theft
Theft esakal

जळगाव : शेतातील डीपीवरून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनिअम तारांची चोरी केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft of aluminum wires in Jalgaon)

लोणवाडी (ता. जळगाव) शिवारातील रवींद्र पाटील यांच्या शेतात महावितरण कंपनीची विद्युत रोहित्र लावण्यात आले आहे. महावितरण कंपनीने याठिकाणी ठेवलेल्या ॲल्युमिनिअमच्या १५ हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. चौकशी केल्यानंतर महावितरण कर्मचारी संतोष पाटील (रा. महाबळ, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

 Theft
लग्नानंतर दागिने, रोकड घेऊन पळालेल्या वधूसह चौघे अटकेत
 Theft
तळपत्या सूर्यामुळे उरल्या फक्त काड्या; वृक्ष जगवण्याकडे दुर्लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com