
Jalgaon Crime News : पोलिस बंदोबस्तातून वाळू डंपर पळविला
Jalgaon News : सशस्त्र चार पेालिस कर्मचाऱ्यांच्या ताब्यातून जप्त केलेला वाळूचा ट्रक पळवून नेला. महसूल प्रशासनाने अवैध वाळूचे जप्त केलेले ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभे केले जातात. (theft of sand dumper from police station jalgaon crime news)
तेथे मंगळवारी (ता. २३) रात्री पोलिस कर्मचारी बाळू पाटील व अविनाश जाधव कर्तव्यावर होते. रात्री सव्वादोनच्या सुमारास त्यांना गाडी सुरू होण्याचा आवाज आला. त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता, महसूलच्या पथकाने जप्त केलेला डंपर (एमएच १९- ५८०८) कोणीतरी घेऊन गेला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
घटनेची माहिती पोलिसांनी महसूल कर्मचाऱ्याला दिली. नंतर जिल्हापेठ पोलिसांना कळविण्यात आले. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. वाळू डंपर चोरून नेल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रात्री उशिरा निलंबनाचे आदेश पारित झाल्याची माहिती मिळाली.