Jalgaon Crime News : धारावीच्या चोरट्याने चोरली जळगावातून कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car Theft

Jalgaon Crime News : धारावीच्या चोरट्याने चोरली जळगावातून कार

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील यमुनानगर-आयोध्यानगरातील आडत व्यापाऱ्याने घरासमोर उभी केलेली कारची चोरी (Car Theft) झाली. (thief from Dharavi stole car from Jalgaon crime news)

मिळालेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी धारावी झोपडपट्टी (मुंबई) येथून अब्दुल रहेमान शहाबुद्दीन शेख (वय ३७) याला अटक केली. कडधान्याचे आडत व्यापारी बबनराव सर्जेराव थोरवे कामावरून २१ फेब्रुवारीला रात्री घरी परतले.

नेहमीप्रमाणे आपल्या घराबाहेर त्यांनी कार (एमएच १९, सीयू ०३५८) चोरट्याने चोरून नेली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना कार चोरीबाबत माहिती मिळाली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

त्यावरून डीबी पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद, सचिन पाटिल, योगेश बारी यांनी मुंबई गाठली. संशयिताचा शोध घेत चोरीच्या कारची खात्री झाल्यावर अब्दुल रहेमान शेख यास अटक केली. त्याच्याकडून चोरीची कार हस्तगत केली. त्याला गुरुवारी (ता. १६) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

टॅग्स :Jalgaoncrimethief