Jalgaon Crime : चोरट्यांनी लांबविला सव्वा लाखाचा ऐवज | thief looted jewellery worth Rs 1 lakh jalgaon crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime : चोरट्यांनी लांबविला सव्वा लाखाचा ऐवज

Jalgaon News : शहरातील नवीन बसस्थानकावर जळगाव- यावल बसमध्ये चढताना स्नेहल अजित तायडे (रा. सत्यमनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्या पर्समधून चोरट्याने १ लाख १२ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी (ता. १०) दुपारी दीडच्या सुमारास घडली. (thief looted jewellery worth Rs 1 lakh jalgaon crime)

स्नेहल तायडे यांचे माहेर ममुराबाद आहे. माहेरी येण्यासाठी बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या छत्रपती संभाजीनगर येथून बसने निघाल्या. दुपारी त्या शहरातील नवीन बसस्थानकात उतरल्या.

दुपारी दीडच्या सुमारास जळगाव- यावल बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तायडे यांच्या पर्समधील ५० हजार रुपयांची सोन्याची पोत व पेंडल, ४० हजार रुपयांची सोन्याची लहान पोत व १० हजार रुपयांचे सोन्याचे दोन टोंगल व १२ हजार रुपयांची सोन्याची पोत, असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तायडे बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी भावाला कॉल करण्यासाठी पर्समध्ये हातात घेतल्यावर त्यांना पर्सची चैन उघडी दिसली. त्यातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला दागिन्यांचा शोध घेतला. मात्र, दागिने मिळून आले नाहीत. याबाबत स्नेहल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Jalgaoncrimethief