
Jalgaon Crime News : दूध डेअरी फोडून चोरट्यांचा चक्क कुरकरेंवर ताव!
जळगाव : शहरातील मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ दूध डेअरी फोडून चोरट्यांनी साडेसात हजारांची रोकड आणि माल चोरून (Theft) नेला. (thieves stole 7 thousand cash and goods from milk dairy jalgaon crime news)
मेहरुणच्या महादेव मंदिराजवळ सोनम रवींद्र पाटील (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी) यांचे छोटेखानी दूध बूथ सेंटर आहे. सोमवारी (ता. ६) दुपारी दीडला दूध बूथ बंद करून पाटील कुटुंब नातेवाइकांकडे लग्नाच्या कार्यासाठी गेले.
मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बंद दुधाचे टपरीचे दार वाकवून आत प्रवेश केला. रोकड व चिल्लर, असा एकूण साडेसात हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (ता. ७) सकाळी साडेसातला उघडकीस आला.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक नितीन पाटील तपास करीत आहे.
दरम्यान, चोरट्यांनी दुकानात आत शिरल्यावर क्रिम बिस्किटे, कुरकुरे व नमकीनवर ताव मारला. चोरटे सोबत खाण्याचे साहित्य घेऊन घेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.