Jalgaon Crime News : बसमध्ये चढताना वृद्धेचे मंगळसूत्र तोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime News : बसमध्ये चढताना वृद्धेचे मंगळसूत्र तोडले

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौकात बसमध्ये चढताना गर्दीत रेटारेटी करुन वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची पोत तोडून चोरट्यांनी पोबारा केला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Thieves stole mangalsutra and gold necklace from neck of an elderly woman jalgaon crime news)

कासमवाडी परिसरातील मालतीबाई सुखदेव देशमुख (वय ६०) या बुधवारी (ता. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास शेगाव येथे जाण्यासाठी अजिंठा चौकातून बसमध्ये बसल्या. मात्र, बसमध्ये त्यांना गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची पोत दिसून आले नाही.

त्यांनी बसमध्ये शोध घेतला, विचारपूस केली, मात्र मिळाले नाही. बसमध्ये चढताना कुणीतरी मंगळसूत्र व सोन्याची पोत चोरुन नेल्याची खात्री झाल्यावर मालतीबाईंनी शुक्रवारी (ता. १७) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

त्यानुसार १० ग्रॅमचे मंगळसूत्र व पाच ग्रॅमची सोन्याची पोत असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक इमरान सैय्यद तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaoncrimethief