Jalgaon Crime News : कजगावात चोरट्यांनी केला कोंबड्यावर हात साफ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief

Jalgaon Crime News : कजगावात चोरट्यांनी केला कोंबड्यावर हात साफ!

कजगाव (जि. जळगाव) : येथील शेतकरी सुधीर पाटील यांच्या शेतातील शेडमधून जवळपास १५ हजार रुपयांच्या पंचवीसहून अधिक कोंबड्या रविवारी (ता. १८) मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेल्या. (thieves stolen 25 chickens at Kajgaon Jalgaon Crime News)

हेही वाचा: Nashik News : दुचाकी अपघातात 2 गंभीर जखमी

शेतकरी सुधीर पाटील यांचे भाऊ संग्राम पाटील सकाळी शेतात गेल्यावर त्यांना कोंबड्या चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी इतरत्र शोध घेतला. मात्र, कोंबड्या काही मिळाल्या नाहीत. रविवारी (ता. १८) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यासाठी काही कार्यकर्त्यांची विशेष व्यवस्था होत होती. सुधीर पाटील यांच्या शेती परिसरात काही लोकांची ओली पार्टी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘ग्रामपंचायतीची निवडणूक अन् कोंबड्यांची चोरी’ याविषयी खमंग चर्चा होत आहे.

हेही वाचा: Nashik News : आर्थिक विवंचनेतून नवदाम्पत्याची गळफास घेत आत्महत्त्या!