Holi Festival : यंदा नैसर्गिक रंगात रंगूया; कानपूरच्या रंगाचे आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shops lined with paint and sprayers in the bazaar. and Citizens while buying colors sold in the market.

Holi Festival : यंदा नैसर्गिक रंगात रंगूया; कानपूरच्या रंगाचे आकर्षण

जळगाव : ‘बुरा ना मानो होली है’, असे म्हणत रंगांची उधळण करणारी धुळवड (धूलिवंदन) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोनोच्या निर्बंधमुक्त वातावरणात यंदा होळी (Holi), धुळवड साजरी होणार आहे. (This year Holi and Dhulvad will be celebrated in coronafree atmosphere jalgaon news)

होळीच्या रंगांचा बेरंग होऊ नये, म्हणून विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. रासायनिक रंगांनी केस, डोळे आणि त्वचेला हानी पोचते. अनेकदा पोटाचेही गंभीर विकार होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, म्हणून नैसर्गिक रंगांची उधळण करण्याचे आवाहन केले आहे.

विविध रंग बाजारात झाले आहेत. कानूपर येथील रंगांना पसंती अधिक आहे. पक्का रंग १० रुपये तोळा, साधे रंग ५० रुपये पावशेरप्रमाणे आहेत. लहान मुलांसाठी पिचकारी २० ते २०० रुपयापर्यंत विविध आकारात, रंगात उपलब्ध आहेत. धुळवड संपली, की साधारण दोन-तीन दिवसांनी त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.

त्वचेवर चट्टे उमटलेले वा केस गळती सुरू झालेले अनेक रुग्ण येतात. रासायनिक रंगामुळे असे प्रकार घडतात. म्हणूनच पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. रासायनिक रंग सहज त्वचेवरून जात नाहीत.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

मग काही जण पेट्रोल- रॉकेलचा वापर करतात, पण त्यामुळे त्वचारोग होण्याचा धोका असतो. त्यासाठी रंगपंचमी खेळायला जाताना केसांना तेल आणि संपूर्ण अंगाला मॉईश्वर क्रीम लावून जावे. जेणेकरून रंग त्वचेवर चिटकत नाही.

रासायनिक रंगांचे दुष्परिणाम

रसायनयुक्त रंग नैसर्गिकपेक्षा स्वस्त म्हणजे १०, १५ आणि २० रुपयांच्या पाकिटात उपलब्ध आहेत. सोनेरी, चंदेरी आणि लाल रंगात उपलब्ध असलेले रासायनिक रंग आरोग्यासाठी हानिकारक असतात. रासायनिक रंगांमुळे केस आणि त्वचेला हानी पोचू शकते.

त्वचेला पूरळ आणि ॲलर्जीची समस्या उद्भवू शकते. सोनेरी- चंदेरी रासायनिक रंग बनविण्यासाठी मेटॅलिक पेस्टचा वापर होतो. डोळ्यांना अलर्जी होते. काहींना कायमचे अंधत्व येण्याचीही भीती असते. त्वचेचा कर्करोग होण्याचीही भीती असते.

रंग पोटात गेल्यास मूत्रपिंड निकामीही होऊ शकते. रासायनिक रंगांमध्ये क्रोमिअम असल्याने फुप्फुसे ती सहज शोषून घेतात. त्यामुळे अस्थमाचा त्रास उद्भवू शकतो. हाडांनाही त्याचा त्रास होतो.

यामुळे आहेत नैसर्गिक रंग सुरक्षित

*पाण्याने सहज धुतले जातात

*नैसर्गिक रंगांची किंमतही माफक आणि सुरक्षाही अधिक

*नैसर्गिक रंगांची निर्मिती करताना तांदूळ आणि मक्याचे पीठाचा वापर

*लाल रंगासाठी बीट, हिरव्या रंगासाठी पालक, मेंदीचा वापर

*भगव्या रंगात शेंदुराच्या बिया, पिवळा रंगासाठी रानभेडी फुले, झेंडू फुलांचा वापर आणि फुले वाळवून त्याची भुकटी बनवून गाळून घेण्यात येते

*गुलाबी आणि जांभळ्या रंगासाठी अष्टर फुलांचा आणि जांभूळ अर्काचा वापर

टॅग्स :HoliJalgaon