जळगाव : तीनशे नमुन्यांचे होणार ‘जिनोम सिक्वेंसिंग’

जिल्ह्यात सध्या ओमिक्रॉन नाहीच; रोज हजार रुग्णांच्या चाचण्या
जळगाव : तीनशे नमुन्यांचे होणार ‘जिनोम सिक्वेंसिंग’

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा(jalgaon) संसर्ग नियंत्रणात असून दररोज सरासरी आठशे- हजार चाचण्या होत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या(omicron varient) संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून आतापर्यंत तीनशे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले असून त्यातून ओमिक्रॉन बाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही, ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे.राज्यात कोरोनाच्या (corona)ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. देशभरात सर्वाधिक ओमिक्रॉन संसर्गित रुग्ण राज्यातच आढळून येत असून दररोजच्या बाधित रुग्णसंख्येतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी (curfew)तसेच नव्याने निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

जळगाव : तीनशे नमुन्यांचे होणार ‘जिनोम सिक्वेंसिंग’
बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने 3500 कोटींचे व्‍यवहार ठप्‍प | Jalgaon

जिल्ह्यात सतर्कता

त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातही सतर्कता बाळगली जात आहे. एकीकडे दररोजच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून दुसरीकडे विदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या व कुणी बाधित असेल तर त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग, टेस्टिंग सुरू आहे.

जळगाव : तीनशे नमुन्यांचे होणार ‘जिनोम सिक्वेंसिंग’
Jalgaon : आनंदाच्या क्षणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर

तीनशे नमुन्यांची तपासणी

गेल्या दोन महिन्यांत जळगाव जिल्ह्यात पाचशेहून अधिक नागरिक विदेशातून आल्याची नोंद आहे. त्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातून जवळपास तीनशे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

सध्या जळगाव जिल्ह्यात एकही ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, पूर्ण सतर्कता बाळगून चाचण्या केल्या जात आहेत. एखादा रुग्ण बाधित आढळला तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने तपासणी होत आहे. चाचण्यांची संख्याही मर्यादित असल्याने एकाच दिवसात अहवाल प्राप्त होत आहे.

- डॉ. किशोर इंगोले, विभागप्रमुख, जीएमसी, जळगाव

जळगाव : तीनशे नमुन्यांचे होणार ‘जिनोम सिक्वेंसिंग’
Jalgaon Crime : चौघुले प्लॉट भागात रात्री खुनी थरार

अशी आहे पद्धत

स्वबॅचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविले जातात. पुण्याच्या प्रयोगशाळेत ही प्रक्रिया होते. त्यात जे नमुने सामान्य म्हणजे कोरोनातील अल्फा, बीटा, डेल्टा व्हेरिएंट बाधित असतात, त्याबाबत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला कोणताही अहवाल दिला जात नाही. जर नमुना ‘डेल्टा प्लस’ अथवा आताच्या ओमिक्रॉन बाधित आढळला तरच कळविले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com