Jalgaon Crime News : शेजाऱ्यांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या |Tired by neighbor harassment man commits suicide jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Jalgaon Crime News : शेजाऱ्यांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Jalgaon News : शेजारचांच्या त्रासाला कंटाळून रामेश्वर कॉलनीतील तरुणाने आत्महत्या केली. (Tired by neighbor harassment man commits suicide jalgaon crime news)

या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उमेश एकनाथ ठाकूर (वय ३७) आई, वडील पत्नी व दोन मुलांसह रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ राहत होता.

त्यांच्या घराशेजारी राहणारे किशोर रमेश तिरमल, गजानन तिरमल, श्यामसुंदर तिरमल, रूखमा तिरमल आणि माधुरी गजानन तिरमल यांनी उमेश ठाकूर यांना न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी वारंवार धमक्या व वेळावेळी मनासिक त्रास दिला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सुसाईड नोटमध्ये शेजाऱ्यांची नावे

उमेश याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये शेजारी राहणाऱ्या तिरमल परिवाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्याने नमूद केले. याप्रकरणी सुरवातील आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती.

गुरुवारी (ता.२७) रात्री उमेश ठाकूरची पत्नी हेमलता ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी ठाण्यात किशोर तिरमल, गजानन तिरमल, श्यामसुंदर तिरमल, रूखमा तिरमल आणि माधुरी तिरमल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक दीपक जगदाळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaondeathtorture