Jalgaon : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sand Smuggling Tractor just for Reference

Jalgaon : वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक (Sand Smuggling) करणारे ट्रॅक्टरवर पोलिसांनी पकडून ट्रॅक्टर (Tractor) चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव तालुक्यासह जिल्‍ह्यात वाळू उपशावर बंदी असून, महसूल प्रशासनाने गस्त वाढविली आहे. (Tractor transporting sand smuggled caught in Jalgaon News)

हेही वाचा: खड्डा नव्हे डासांचा अड्डा; महाकाय खड्डा बुजविण्याची मागणी

शिवकॉलनीत राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) सोमवारी (ता. ९) पहाटे पाचला विना क्रमांकाचे ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे गस्तीवर असलेले रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी राहुल चौधरी यांना समजले. त्यांनी तातडीने शिवकॉलनीत विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता, चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. वाळूने भरलेले ट्रॅक्टर रामांनदनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याबाबत पोलिस नाईक राहुल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक उमेश विठ्ठल बाविस्कर (वय २२, रा. निमखेडी, ता. जि. जळगाव) याच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र तावडे तपास करीत आहे.

हेही वाचा: नाशिक : स्त्रीधन वगळता सर्वच मालमत्तांवर येणार टाच

Web Title: Tractor Transporting Sand Smuggled Caught Case Filed In Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top