Police Transfer : सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या | Transfers of Assistant Police Inspector in 7 police station jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

Police Transfer : सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

Jalgaon News : जिल्ह्यातील सात पोलिस ठाण्यांतील सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत. (Transfers of Assistant Police Inspector in 7 police station jalgaon news)

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी नवीन जागी पदभार स्वीकारला आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांची नियंत्रण कक्षात विनंती बदली झाली आहे.

त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील नीलेश वाघ आले आहेत. कासोदा पोलिस ठाण्याच्या प्रभारी नीता कायटे यांची एएचटीयू सेलमध्ये बदली झाली असून, त्यांच्या जागी एएचटीयू सेलच्या योगिता नारखेडे यांची बदली झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नशिराबादचे अनिल मोरे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. त्यांच्या जागी ‘एमआयडीसी’चे रामेश्वर मोताळे यांची बदली झाली आहे. रावेरचे शीतलकुमार नाईक यांची मारवड पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

टॅग्स :JalgaonpoliceTransfers