जळगाव : रिक्षावाले काका..आता येईना दारी!

School Van
School Vanesakal

जळगाव : कोरोना महामारीचे (Corona pandemic) दोन वर्षे बंद असलेल्या शाळांची घंटा वाजली असून चिमुरड्यांनी शाळेकडे धाव घेतली आहे. काही शाळांना शैक्षणिक शुल्कात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ केल्यानंतर आता शाळेपर्यंतचा प्रवासही (Travel) त्यापेक्षा महाग झाला असून ऑटो, व्हॅनच्या (Van) दरात तब्बल तिप्पट वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. (Travel to school become 3 times more expensive jalgaon inflation news)

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना १३ ते १५ जूनपासून सुरवात झाली आहे. नव्याने शाळा प्रवेशासह वरच्या वर्गात पास झालेल्यांना रंगबेरंगी वह्या पुस्तके, दप्तर, वॉटरबॉटल-टिफीन असा पूर्ण नवासाज या सरस्वतीच्या लेकरांनी परिधान करुन शाळेची वाट धरली आहे.

शिक्षण महागले

कोरोनानंतर महागाई दरात वाढ झाल्याने शाळांनी २० ते ३० टक्के शुल्कवाढ केली आहे, सोबतच गणवेश-वह्या पुस्तकांच्या दरातही वाढ झाली आहे. या शुल्कवाढीचा शॉक लागताच पालकांना आता पाल्यांना शाळेपर्यंत पोचविण्याच्या प्रवासदरात झालेल्या मोठ्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. रिक्षाभाडे दरात चक्क तिप्पट वाढ केल्याने पालकवर्गाकडून तक्रारी वाढल्या आहेत.

अशी झाली दरवाढ

वर्ष-२०१८-१९ मध्ये ५०० रुपये महिना असलेले ऑटेारिक्षा व्हॅनचे भाडे आता दीड हजार रुपये मागितले जात आहे. तर, शाळेपासून जवळच्या परिसराचे आठशे ते हजार रुपयांचा दर पालकांना न परवडण्यासारखा आहे. तर, पेट्रोल-डिझेलसह गॅसचे दर वाढले, ऑटोक्षेत्रातील स्पेअरपार्टचे दर वाढल्याने परवडत नसल्याचा रिक्षावाल्या काकांचा युक्तिवाद आहे.

शाळांजवळ आईंचीच गर्दी

ऑटोरिक्षा आणि व्हॅनची झालेली तिप्पट भाडेवाढ परवडेना अशी असल्याने पाल्यांना ने-आण करण्यासाची जबाबदारी आता आईच्या खांद्यावर आली आहे. सकाळी वडील मुलांना सोडून कामावर निघून जातात. शाळा सुटल्यावर स्कुटर घेऊन आई घ्यायला येते. परिणामी शाळांच्या प्रवेशद्वारावर पालकांचीच अधिक गर्दी झाल्याचे दिसून येते.

सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

परीक्षेसाठी स्कूटरवरुन शाळेत आलेल्या चौथी इयत्तेतील मुलाचा घरी परतताना मोहाडीरोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना अवघ्या दोन महिन्यापूर्वीच घडली आहे. तेव्हाही स्कूलबस बंद असल्याने पालक स्कूटरवरुन या विद्यार्थ्यांची ने-आण करत असल्याने अनावधानाने हा अपघात घडला अन्‌ चिमुरड्याला जीव गममावा लागला. तशीच परिस्थिती रिक्षा- व्‍हॅनची तिप्पट भाडेवाढ झाल्याने निर्माण झाली असून मुलांची असुरक्षितपणे दुचाकींवरुन ने-आण सुरु आहे.

असे वाढलेत इंधनदर

वर्ष --------२०१८........२०१९.......२०२०.......२०२१.....२०२२

पेट्रोल ः- ७७ ते ८१ रु. ७४.४४रु. ११०.३३रु. ११५.५७ ११२.६०

डिझेल ः- ७०.58 रु. ६७.०९ ८०.१७ ९४.१४ १०४.७७

School Van
Nashik : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोलवर 54 रुपयांची सूट

एरियानुसार दर..

रिक्षासंघटनेतर्फे तिप्पट भाववाढीवर बाजू मांडताना दिलीप सपकाळे म्हणाले की, शाळेपासून जवळचा परिसर असेल तर ६०० ते ८०० रुपये मासिक, थोडा दूरचा भाग असेल तर हजार-बाराशे, आणि अगदीच दहा-बारा किलोमीटरचे अंतर असेल तर पंधराशे रुपयांपर्यंत मासिक भाडे मागितले जात आहे.

School Van
Breaking News : पंचवटीत अपघात; सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाईलाज झालाय

"एस.के. ऑईल मिल परिसरातून ओंकारेश्वर मंदिरापर्यंतसाठी महिन्याला पंधराशे रुपये भाडे मोजावे लागताय. कुटुंबात तिघा मुलांना शाळेत ने-आणसाठी साडेचार हजारांचा भुर्दंड यावर्षी वाढला आहे. पूर्वी हेच भाडे ६०० रुपये घेतले जात होते." - भरत लाठीगरा, पालक

"ऑटो-वन चालकांवरही महागाईचे संकट कोसळले आहे. शाळेचे विद्यार्थी वर्षभरासाठी असले तरी, इंधनदरात दररोज होणारी प्रचंड वाढ, वाहनांचे स्पेअरपार्ट महागलेत. रिक्षाचालक कुणालाही अडवणूक करत नाहीये.. उलट पालकांशी चर्चा करुन वेळ पडल्यास आम्ही शे- दोनशेची कळही सोसतो. याबाबत संघटनेची बैठक घेऊन मार्ग काढू." - दिलीप सपकाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com